सावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं
Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.
मुंबई : आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये काहीही सर्च करायचं झालं किंवा काही सेव्ह करायचं झालं की, गुगलचा वापर करतो. गुगलमुळे आपली बरीचशी कामं सोपी झाली आहेत. परंतु तुम्हाला हे देखील माहित आहे की, नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे गुगलचा वापर करणं आपल्यासाठी जितकं फायदेशीर आहे तितकचं नुकसान कारक आहे. Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते. यामुळे तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते.
नवीन आयटी नियमांतर्गत, कॉपीराइट नियम, ट्रेडमार्क, न्यायालयाचे आदेश, लैंगिक ग्राफिक्स सामग्री आणि फसवणूकीशी संबंधित प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात गुगलने 28 हजार 87 तक्रारी दाखल केल्या आहेत.
Google ने सुमारे 61 हजार 114 कंटेन्ट काढून देखील टाकला आहे. गुगलने मासिक पारदर्शकता अहवालात याचा खुलासा केला आहे. अहवालानुसार, Google कडील वापरकर्त्यांच्या तक्रारींव्यतिरिक्त, नोव्हेंबर महिन्यात ऑटोमेटेड डिटेक्शन मोडमधून कंटेन्टचा 3 लाख 75 हजार 468 भाग काढून टाकण्यात आलेला आहे.
ऑक्टोबर महिन्यात, Google ला वापरकर्त्यांकडून 24 हजार 569 तक्रारी प्राप्त झाल्या आणि या काळात सुमारे 48 हजार 594 सामग्री काढून टाकण्यात आली. तसेच, ऑटोमेटेड डिटेक्शन मोडमधून सामग्रीचे 3 लाख 84 हजार 509 भाग काढून टाकण्यात आले. अमेरिकन कंपनी Google ने मे 2021 मध्ये लागू केलेल्या नवीन IT नियमांनुसार दाखल केलेल्या प्रकटीकरण अहवालात याचा खुलासा केला आहे.
हे लक्षात घ्या की या सर्व तक्रारी थर्ड पार्टी कंटेंटबद्दल होत्या, ज्यात स्थानिक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तुम्ही देखील कोणाचा कंटेन्ट वापरत असाल, त्या व्यक्ताला त्याचे क्रेडिट्स देत नसाल आणि तुमच्या बद्दल जर एखाद्या व्यक्तिची तक्रार आली तर तुमचा तो कंटेन्ट हटवला जाईल, तसेच तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.