सावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी
जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं.
मुंबई : जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं. पण गूगलवर जर एक अशी गोष्टी सर्च केली तर तुमची अडचण वाढू शकते. गूगल या गोष्टीवर नजर ठेवून आहे आणि गरज पडली तर तुमच्या घरी पोलीस देखील पाठवू शकते.
आता गूगलवर कोणताही फालतू प्रश्न विचारतांना १० वेळा विचार करा. परीक्षेचा निकाल लागणं सुरु झालंय. या दरम्यान अनेक मुलं हताश होऊन आत्महत्या करतात. यासाठी अनेक जण गूगलवर आत्महत्या करण्यासाठी काहीतरी सर्च करतात.
गूगल आता अलर्ट झाला आहे. कोणीही जर आत्महत्या करण्याचा विचार करत असेल तर गूगल त्याला असं करण्यापासून रोखणार आहे. गूगल सर्चवर 'suicide' किंवा 'I want to kill myself' अशा गोष्टी शोधाल तर मग गूगल लगेच तुम्हाला असं करण्यापासून रोखणार आहे.