AC Electricity Use Tips: उन्हाळ्यात (Summer) होणारं गरम आणि सतत येणारा घाम या दोन्ही गोष्टी न टाळता येणाऱ्यासारख्या आहेत. याच दोन गोष्टींवरील सर्वात सोपा उपाय म्हणजे एअर कंडिशनर (Air Conditioner) म्हणजेच एसी (AC). उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर वाढतो हे तसं वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्यापैकी अनेकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये एसीचा वाढलेला वापर हा उन्हाळ्यात प्राकर्षाने जाणवतो. वातावरणातील हीट आणि उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून ठराविक बंदिस्त जागा थंड करण्यासाठी एसीचा वापर  केला जातो. मात्र त्याचवेळी उन्हाळ्यात येणारी भरमसाठ विजेच्या बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण फारच जपून आणि मोजक्या तासांसाठी एसी वापरतात. विजेचा जास्त वापर होऊ नये म्हणून अनेकजण अगदी अर्धा एक तास एसी चालू करुन रुम थंड झाल्यानंतर तो बंद करतात. मात्र थोडाच वेळ एसी वापरुनही फार बील येत असल्याची तक्रार अनेकजण करतात. असं का होतं?


एसी रिमोटने बंद करतात पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा होतं असं की लोक एसी रिमोटने बंद करतात. मात्र केवळ रिमोटने एसी बंद केल्याने वीजेचं बील येत नाही असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. त्यामुळेच एसी कमी वेळासाठी सुरु ठेवला तरी फार विजेचं बील येतं अशी अनेकजण तक्रार करतात. पण एसीचं आणि वीज वापराचं नेमकं गणित काय असतं हे समजून घेऊयात. होतं असं की अनेकजण एसीचा वापर प्रामुख्याने बेडरुममध्ये करतात. रात्री झोपेत असताना एसी सुरु नसावा असं वाटलं तर केवळ रिमोटने तो बंद करतात. एसीचा मुख्य स्वीच झोपण्याच्या जागेपासून दूर असल्याने तो बंद करण्याच्या भानगडीत लोक पडत नाहीत. मात्र याच आळसामुळे तुमचं विजेचं बिल वाढतं. 


रिमोटने एसी बंद करतो तेव्हा...


रिमोटने जेव्हा एसी बंद केला जातो तेव्हा घरातील एसीचं युनीट बंद होतं. मात्र खिडकीबाहेर लावलेलं युनिट चालू असतं. जेव्हा रिमोटने एसी बंद करतो तेव्हा एसीच्या डिस्प्लेवरील लाईट बंद होतात. त्यामुळे एसी पूर्ण बंद झाला असं अनेकांना वाटतं. मात्र रिमोटने एसी बंद केला तरी बाहेरच्या युनिटसाठीचा वीजपुरवठा सुरु असतो. आऊटडोअर युनिट घराबाहेर असल्याने त्याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणजेच केवळ रिमोटने एसी बंद केला तरी तो वीज वापरत राहतो. त्यामुळेच रिमोटने एसी बंद केल्याने प्रत्यक्षात रुममध्ये थंड हवा लागत नसेल तरी एसी वीज खात असतो. त्यामुळेच एसी कमी वापरला तरी विजेचं बील अधिक येतं.


बील मर्यादित ठेवायचं असेल तर...


म्हणूनच एसी वापरुनही वीज बिल मर्यादित ठेवायचं असेल तर केवळ रिमोटने एसी बंद न करता मेन स्वीचही बंद करावा. ही सवय आर्थिक दृष्ट्याही फायद्याची ठरु शकते. मुख्य स्वीच बंद केल्याने बाहेरील युनिटला होणार वीज प्रवाह खंडित होतो.