Maruti Suzuki Swift: मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. दर महिन्याला येणाऱ्या विक्रीच्या आकडेवारीवरून या शिक्कामोर्तब लागलेला आहे. ग्राहकांचा ओढा आणि गरज पाहून कंपनी आपल्या गाड्यांमध्ये वेळेनुसार बदल करत आहे. आता कंपनी न्यू जनरेशन सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) डिसेंबर 2022 मध्ये लाँच करणार आहे. हॅचबॅक नवं मॉडेल पुढच्या वर्षी भारतात लाँच होणार आहे. इंडो-जापानी ऑटोमेकर कंपनी 2023 च्या सुरुवातीला दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये सादर करणार आहे. हा इव्हेंट 13 जानेवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणार आहे. मात्र असं असलं तरी कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुति सुझुकी (Maruti Suzuki) स्विफ्ट कारमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणि अपग्रेड फीचर्स दिले जातील. या गाडीमध्ये नव्याने डिझाइन केलेले ग्रिल, मोठे एअर-इनटेक, सी आकाराचे एअर स्प्लिटरसह अपडेटेड बंपर, नवीन एलईडी स्लीक हेडलँप आणि पुढच्या बाजूला फॉग लँप असेम्बली असेल. ड्युअल-टोन अलॉय व्हील, नवीन बॉडी पॅनेल्स, चाकांच्या कमानीवरील फॉक्स एअर व्हेंट्स, ब्लॅक आऊट पिलर आणि छतावर बसवलेला स्पॉयलर असेल अशी अपेक्षा आहे.  रियर सेक्शनमध्ये म्हणजेच गाडीच्या मागच्या बाजूला काही बदल अपेक्षित आहेत. ही गाडी बलेनो हॅचबॅक सारखी मोडिफाइड हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली जाईल.  नव्या स्विफ्टची लांबी 3845 मीमी, रुंदी 1735 मीमी आणि उंची 1530 मीमी असू शकते. व्हिलबेस 2450 मीमी असेल. 


PMV Electric: मिनी इलेक्ट्रिक कार 16 नोव्हेंबरला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन 2023 मारुती स्विफ्ट माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.2 लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये लाँच केली जाईल. यात माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञानाशिवाय 1.2 लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळेल. हॅचबॅक 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह ऑफर केली जाऊ शकते. 1.4L बूस्टरजेट टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन न्यू जनरेशन सुझुकी स्विफ्ट स्पोर्टमध्ये आढळू शकते.