मोबाईल ट्रॅक करत असल्याचे जाणून घेण्यासाठी `हे` आहेत कोड्स!
अॅनरॉईडचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र वापर जितका अधिक होत आहे तितकेच सुरक्षिततेचे प्रश्न देखील समोर उभे राहत आहेत.
नवी दिल्ली : अॅनरॉईडचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र वापर जितका अधिक होत आहे तितकेच सुरक्षिततेचे प्रश्न देखील समोर उभे राहत आहेत. म्हणून डिव्हाईज सुरक्षित ठेवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपण स्वतःच त्याबद्दल जागरूक रहाणे. अनेकदा आपल्या मोबाईल मधील माहिती कोणी ट्रॅक करत आहे का? याचा पत्ता आपल्याला लागत नाही.
काहींना अशी शंका जरी आली तरी ते माहित कसे करून घ्यायचे हे लोकांना काळत नाही. मात्र असे काही कोड्स आहेत, ज्यामुळे कोणी आपला फोन ट्रॅक करत आहे का किंवा कॉल दुसरीकडे फॉरवर्ड होत आहे का, याची माहिती मिळते.
कोड: ##4636##
या कोडच्या मदतीने फोनची बॅटरी, वाय फाय कनेक्शन टेस्ट, मॉडल नंबर, रॅम यांसारखी सगळी माहिती मिळते.
कोड: *#21#
तुमचे कॉल किंवा मेसेज दुसरीकडे डायव्हर्ड तर झाले नाहीत ना, ते तपासण्यासाठी या कोडची मदत होईल.
कोड: *#62#
या कोडमुळे तुमचा नंबर दुसऱ्या नंबरवर री-डायरेक्ट झालेला नाही ना, हे कळेल.
कोड: ##002#
या कोडच्या मदतीने तुम्ही फोनवर येणारे सगळे कॉल फॉरवार्डिंग डी अॅक्टिव्हेट करू शकता.
या चार ही कोड्सवरून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुमच्या मोबाईलमधील माहिती सुरक्षित आहे की नाही ? तसंच असे होत असल्यास तुम्ही ते थांबवू शकता. यांसारख्या घटनांपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपला फोन आपल्या जवळ ठेवा आणि त्याबद्दल सजग रहा.