नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये Xiaomi चा दबदबा कायम आहे. वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये  मागील वर्षाच्या तुलनेत भारतीय स्मार्टफोन मार्कटमध्ये 12 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान 38 मिलियन स्मार्टफोन शिपमेंट करण्यात आले आहेत. वर्ष 2021 मध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी स्मार्टफोन ब्रॅंड Xiaomi  चा दबदबा कायम असलेला दिसून आला आहे. या लिस्टमध्ये सॅमसंग आणि ऍपल सारखे ब्रॅंड मागे पडले आहेत.


बेस्ट सेलिंग स्मार्टफोन
Xiaomi ब्रॅंड वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारतातील सर्वात जास्त विक्री होणारा ब्रॅंड म्हणून समोर आला आहे. 


Xiaomi च्या Redmi 9A, Redmi 9 Power, Redmi 9 आणि Redmi Note 10s ची स्मार्टफोनची मार्केटमध्ये मोठी मागणी राहीली आहे.


सोबतच POCO M3 आणि POCO C3 स्मार्टपोनला भारतात चांगलीच पसंती मिळत आहे. 


Xiaomi नंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग (samsung) ब्रॅंड आहे. भारतात सॅमसंगचे Galaxy A22, Galaxy A12 या स्मार्टफोनला अधिक पसंती मिळत आहे.