मुंबई : स्मार्टफोनच्या सेन्सरने तुम्ही अशी अनेक सिक्रेट कामे करु सकता ज्याबाबत फार कमी युजर्सना माहीत आहे. सेन्सॉरच्या मदतीने फोनची बॅटरी आणि डेटा वाचवला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी तुम्हाला फोनमध्ये एक छोटा २२ केबीचा अॅप डाऊनलोड करावा लागेल. याचे नाव Proximity Service आहे. हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही फोनच्या सेन्सरच्या मदतीने अनेक कामे करु शकता. 


गुगल प्ले स्टोरवरुन असे करा डाऊनलोड


हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करु शकता. या अॅपसाठी ४.५ रेटिंग देण्यात आलीये. हे अॅप ४ अथवा त्यावरील व्हर्जनवर काम करते. फोनच्या स्क्रीनवर दोन गोळे बनतात. हाच फोनचा सेन्सर असतो. 


असे होते अॅक्टिव्ह


प्लेस्टोरवरुन हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर जसेच तुम्ही ओपनवर टॅप करता. त्यानंतर हे अॅप अॅक्टिव्ह होते. 


डेटा आणि बॅटरी दोन्ही वाचेल


जर तुम्हाला यूट्यूबवर केवळ ऑडियो स्वरुपात गाणी ऐकायची आहेत. व्हिडीओ पाहायचा नाहीये. तर त्यासाठी केवळ या सेन्सरवर हात ठेवा. आता तुम्हाला केवळ ऑडिओ ऐकू येईल. स्क्रीन ऑफ होईल.


अॅपमुळे अशी बंद होईल स्क्रीन


अनेकदा फोनवर बोलून झाल्यानंतर आपण फोन स्क्रीन ऑफ न करता तसाच ठेवतो. ज्यामुळे एखादे अॅप चुकून चालू होऊ शकते. यामुळे बॅटरी आणि डेटा दोन्ही वापरला जातो. मात्र हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर जसे तुम्ही तुमचा फोन पाकिटात ठेवा तेव्हा फोनची स्क्रीन ऑफ होईल.