सावध व्हा! AC चा थंडावा देतोय आयुष्यभराची डोकेदुखी
जगभरात 190 कोटींच्या आसपास AC चा वापर
मुंबई : कोरोना विषाणूचा तडाखा साऱ्या जगाला बरेच धडे देऊन गेला, काही कारणांच्या माध्यमातून सतर्क करुन गेला. एकिकडे कोरोनाचा तडाखा सर्वांच्या जगण्यावरच परिणाम करत असताना दुसरीकडे हवामानात होणाऱ्या बदलांमुळंही अनेकजण बेजार आहेत. अवकाळी पाऊस, हिमवृष्टी, गारपीट, वाढती उष्णता या साऱ्यांचा सामना तुम्ही आम्ही, आपण सगळेच करत आहोत.
जगातील अनेक राष्ट्रांमध्ये वातावरणामध्ये झालेले बदल दिसून येत आहेत. भारतातही चित्र काही वेगळं नाही. लांबलेला उन्हाळा आता कधी एकदा सरतो आणि कधी एकदा थंड हवेची झुळूक दिलासा देते याचीच वाट सर्वजण पाहत आहेत. पण उष्णतेचं प्रमाण मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. याच उष्णतेपासून वाचण्यासाठी म्हणून बहुतांश ठिकाणी, AC चा वापर करण्याला प्राधान्य देण्यात आलं. काही घरांमध्ये तर एका वेळी 3 पेक्षाही अधिक AC लावले. AC लावल्यामुळे घराच्या आतील वातावरण थंड झालं खरं, पण बाहेरील परिसरात मात्र तापमान वाढत गेलं.
AC मुळं ओझोन थरावर परिणाम
उष्ण वाताववरणाला दूर लोटण्यासाठी म्हणून AC चा वाढता वापर आला धोक्याच्या वळमावर पोहोचला असून, त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीचं प्रमाणंही दिवसेंदिवस वाढत आहे. IFOREST नं केलेल्या निरिक्षणानुसार रेफ्रिजरेटरच्या नावाखाली एसीमध्ये HCFC चा वापर केला जातो. जे HFC चं नवं वर्जन आहे. याचाच थेट परिमाम ओझोनच्या थरावर होतो.
जागतिक तापमान वाढ झपाट्यानं गंभीर रुप धारण करत आहे
जगभरात मागील तीन वर्षांपासून एसीचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. ज्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचंही प्रमाण वाढलं आहे. यामागं ऋतूचक्रामध्ये झालेले बदलही कारणीभूत ठरत आहेत.
एका Trick ने जाणून घ्या WhatsApp वर तुमचा पार्टनर कोणाला पाठवतो सर्वाधिक फोटो आणि व्हिडीओ
2050 पर्यंत एसीची मागणी चारपट वाढणार
सध्याच्या घडीला जगभरात 190 कोटींहून अधिक एसी युनिटचा वापर केला जात आहे. भारतात दर वर्षी एसीच्या वापरात 10- 15 टक्क्यांनी वाढ होत आहे. जगभरात एसीच्या वापरातं हे प्रमाण 2050 पर्यंत चार पटींनी वाढलेलं असेल. इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीच्या मते, एका एसीसाठी सर्वाधिक उर्जा लागते. ज्यामुळं एसी कार्बन डायऑक्साईड आणि ग्रीन हाऊस वायू मोठ्या प्रमामात हवेत मिसळतात.
यावर उपाय काय?
IFOREST ला निरिक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार ग्रीन कुलिंग पर्यायाचा गांभीर्यानं विचार केला जाणं महत्त्वाचं आहे. ग्रीन कुलिंग हा एक असा पर्याय आहे जिथं HFC आणि HCFC ऐवजी hydrocarbon सारख्या नैसर्गिक वायुचा वापर केला जाईल. भारताला ग्रीन कुलिंगसाठी नॉटइन काइंड या तंत्राचा वापर करावा लागेल ज्यामध्ये evaporative कूलिंग,structural कूलिंग, सोलर कूलिंगचा समावेश आहे.