Independence Day Offer: देशातील नंबर एकची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन रिचार्ज प्लान्स आणत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता स्वातंत्र्य दिनानिमित्तदेखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये, अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक फायदे मिळणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी जिओने 2,999 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन आणला आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, अमर्यादित डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय जिओ कंपनीच्या सर्व अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर जिओ कंपनी तुम्हाला 5800 रुपयांपर्यंच्या वेगवेगळ्या ऑफर्स देणार आहे.


रिलायन्स जिओची स्वातंत्र्यदिनाची ऑफर


स्विगी: या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 249 रुपये किंवा त्याहून अधिक खरेदीवर 100 रुपयांची सूट दिली जाईल.


यात्रा: ग्राहकांना फ्लाइट बुकिंगवर रु. 1500 आणि हॉटेल बुकिंगवर रु. 4000 पर्यंत सूट मिळते. पण यामध्ये किमान सवलतीची ऑफर नाही.


अजिओ: 999 रुपयांच्या या ऑफरमध्ये तुम्हाला 200 रुपयांची सवलत मिळते.


रिलायन्स डिजिटल: निवडक वस्तूंवर फ्लॅट 10% सवलत आहे आणि कोणतीही घरगुती वस्तू खरेदी केल्यास 10% सवलत आहे.


Netmeds: Rs.999+NNM Supercash च्या ऑर्डरवर 20% सवलत मिळेल.


रिचार्ज कसे कराल?


तुम्ही MyJio अ‍ॅप किंवा वेबसाइटला भेट देऊन हे रिचार्ज करू शकता. येथे जाऊन 2999 रुपयांचा रिचार्ज प्लान निवडा. त्याचे पेमेंट करा आणि अनेक ऑफर्सचा लाभ घ्या.