बंगळुरू : आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हल्ल्यांचा वेग वाढलाय. वेब अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वायरस हल्ल्यांच्या टार्गेटवर भारताचा क्रमांकही आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी कंपनी एकामाई टेक्नॉलॉजीनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वायरस हल्ल्यांच्या टार्गेट असलेल्या देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे. तर सोर्स देशांच्या यादीत पाचव्या स्थानावर... आत्तापर्यंत भारतावर १२ मिलियन हल्ल्यांची नोंद करण्यात आलीय.  


डिस्ट्रिब्युट डेनियल ऑफ सर्व्हिस (DDOS) हल्ल्यांत न २८ टक्क्यांची वाढ झालीय. 'क्यू२ २०१७ स्टेट ऑफ द इंटरनेट / सिक्‍योरिटी रिपोर्ट' नावानं हा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 


उल्लेखनीय म्हणजे, यात एका गेमिंग कंपनीवर ५५८ वेळा म्हणजेच एका दिवसात सहा वेळा इंटरनेट हल्ला करण्यात आल्याचाही यात उल्लेख करण्यात आलाय.