मुंबई : भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.


भारताला बराच मोठा पल्ला गाठावा लागेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिक्स ब्रॉडबॅण्डबाबत बोलायचे तर, भारत 76व्या क्रमांकावर आहे. नुकतीच भारताने यात 15 टक्के सुधारणा केली आहे. जगभरातील इंटरनेटचे स्पीड तपासणाऱ्या ऊकला नावाच्या संस्थेने आपल्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतात मोबाईल स्पीड 8.8Mbps इतके राहिले आहे. तर, ब्रॉडबॅंण्ड इंटरनेट स्पीड 18.82 Mb इतके राहिले आहे. स्पीड टेस्टींग संस्था ऊकलाने सांगितले की, 'भारतात मोबाईल आणि फिक्सड ब्रॉडबॅंड इंटरनेट दोन्हीचा वेग वाढला आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही बाब चांगली बातमी आहे. मात्र, जगभरातील देशांशी स्पर्धा करायची तर भारताला इंटरनेट स्पीडमध्ये बरीच मोठी मजल मारावी लागेल', असेही ऊकलाने म्हटले आहे. 


इंटरनेट स्पीडमध्ये कोण आहे आघाडीवर?


मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये नॉर्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे. नॉर्वेमध्ये नोव्हेंबरमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 62.66 Mbpsइतके राहिले आहे. फिक्स्ड ब्रॉडबॅण्ड कॅटेगरीत सुंगापूर 153.85 Mbps सरासरी स्पीड गाठत टॉप राहिला आहे. 2017च्या सुरूवातीला भारतत सरासरी मोबाईल  डाऊनलोड स्पीड 7.65 Mbps होती. जी नोव्हेंबरमध्ये 15 टक्क्यांनी वाढून  8.8Mbpsवर पोहोचली. फिस्क्ड ब्रॉडबॅण्ड कॅटेगरीत  50 टक्के गती आली. हेच स्पीड जानेवारीत 12.12Mbps इतके होते. तर, नोव्हेंबरमध्ये 18.18Mवर पोहोचले.


भारताकडून मोठ्या आपेक्षा


दरम्यान, ऊकलाने भारताकडून मोठ्या आपेक्षा व्यक्त केल्या आहेत. भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स जिओसारख्या कंपन्यांनी भारतातील टेलिकॉम क्षेत्रात 2017मध्ये कोट्यवधी ग्राहकांसाठी वाजवी दरात हायस्पीड डेटा उपलब्ध करून दिला आहे, असेही ऊकलाने म्हटले आहे. पण, थ्रीजी स्पीडमध्ये इंटरनेट वापरणाऱ्या नेटवर्कला हाय स्पीडमध्ये बदलवण्याचे मोठे आव्हान या कंपन्यांसमोर असल्याचेही ऊकलाने म्हटले आहे.