Google Playवरुन ऍप डाउनलोड करण्यात भारत अव्वल स्थानी
नवी दिल्ली : भारतीय बाजारात ज्या प्रकारे स्मार्टफोनची वाढ होते आहे. त्याचप्रकारे ऍपचा बाजार वाढतो आहे. २०१८ मध्ये प्ले स्टोअर वरुन सर्वात जास्त ऍप डाउनलोड करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. भारतीय लोकांनी सर्वात जास्त ऍन्ड्राइड ऍप डाउनलोड केले आहेत. 'द स्टेट ऑफ मोबाइल इन २०१९' च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
ऍप डाउनलोडींगमध्ये १६५ टक्के वाढ
ऍप डाउनलोडींगच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे. जगभरातून सर्वात जास्त ऍप डाऊनलोडींग संख्येत भारतीय लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. २०१८ मध्ये भारतात १६५ टक्क्याने वाढ झाली आहे. गुगल डाउनलोडींगच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर ब्राझील तर तिसऱ्या स्थानावर अमेरिका आहे.
कोणत्या ऍपचा सर्वात जास्त वापर
या वर्षात भारतीय लोकांनी खाद्य पदार्थाची ऑर्डर करणाऱ्या ऍपला सर्वाधिक डाउनलोड केले आहे. जगभरात झोमॅटो आणि उबेर इट्स जादा डाउनलोड करण्यात आले आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर पहिल्या ऑर्डरवर मिळणारी सूट म्हणून संबधित ऍपला जादा डाउनलोड केले असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. तसेच स्विगी फूड डिलिव्हरी ऍपचा पण यात समावेश आहे. फू़ड आणि ड्रिंक्स ऍपमध्ये १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर फायनान्शिअल ऍप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आले आहेत.