मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 19 जून म्हणजेच आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship)अंतिम सामण्याची सुरवात होणार आहे. हे सामने दररोज दुपारी  3 वाजता सुरू होणार आहेत. जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल आणि तुम्हाला या सामन्याचे सगळे अपडेट जाणूण घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या चांगल्या सुविधा घेऊन येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे टेस्ट सामने  Disney+ HotStar आणि Star Sports चॅनेलद्वारे थेट प्रसारित केले जात आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही वापरणारे यूझर्स Disney+ HotStar चे  VIP आणि प्रीमियम सब्सक्रिप्शनसह सामना पाहण्यास सक्षम असतील.


टेलिकॉम कंपनी  Airtelआणि Jioच्या काही प्रीपेड योजनांसह  Disney+ HotStar ची VIP सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्ही त्या प्रीपेड योजनांसह आपला नंबर रिचार्ज केल्यास तुम्हाला विनामूल्य  Disney+ HotStar ची VIP सदस्यता मिळेल.


Jioच्या 401 आणि 598 रुपयांच्या प्रीपेड  Disney+ HotStar ची VIP सदस्यता विनामूल्य सदस्यता मिळत आहे. Jioच्या 401 रुपयांच्या योजनेबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 28 दिवसांच्या वैधता उपलब्ध आहे. या योजनेत, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य Voice calling चा लाभ उपलब्ध आहे. तसेच, यूझर्सना 90GB चा हाय स्पीड डेटा मिळत आहे.


त्याचबरोबर 598 रुपयांच्या योजनेची वैधता 56 दिवसांची आहे. या योजनेत उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांविषयी बोलताना, यूझर्सना यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर मोफत Voice calling आणि दररोज 100 SMSचा लाभ उपलब्ध आहे.


Disney+ HotStar VIP सदस्यता 599, 448 आणि 401  रुपयांच्या एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज योजनेसह उपलब्ध आहे. एअरटेलच्या 401 रुपयांच्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. या योजनेत एकूण 30GB डेटा उपलब्ध आहे. परंतु यात  Voice calling ची सुविधा उपलब्ध नाही. या प्रीपेड योजनेत युजर्सना 399 रुपये किंमतीची Disney+ HotStar VIP वार्षिक सदस्यता मिळते.


एअरटेलच्या या 448 रुपयांच्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. या योजनेत दररोज 3 GB डेटा आणि अमर्यादित Voice callingचे फायदे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 598 रुपयांच्या प्रीपेड योजनेत यूझर्सला 56 दिवसांची वैधता मिळते. या योजनेत, अमर्यादित Voice callingसह, दररोज 2 GB डेटाचा लाभ उपलब्ध आहे.