सिंगापूर : आयफोनची क्रेझ सर्वांनाच असते. आपल्याकडे आयफोन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यामुळेच एका मुलीच्या वडिलांनी १३ तास रांगेत उभं राहत आपल्या मुलीला आयफोन गिफ्ट दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील एक व्यापारी असलेल्या व्यक्तीने आफल्या मुलीला लग्नाचं गिफ्ट म्हणून आयफोन दिला. हा आयफोन खरेदी करण्यासाठी या मुलीचे वडील सिंगापूरमध्ये पोहोचले आणि त्यांनी रात्रभर १३ तास रांगेत उभं राहत फोन खरेदी केला.


स्ट्रेट्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बाजारात नुकतचं लॉन्च करण्यात आलेला आयफोन ८ प्लस खरेदी करण्यासाठी अमीन अहमद ढोलिया सिंगापूरात दाखल झाले. त्यांनी म्हटलं की, मला दोन फोन खरेदी करायचे आहेत. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रांगेत रात्रभर उभा राहीलो. मला आता फारच चांगलं वाटत आहे. मात्र, रात्रभर रांगेत उभ राहणं खुपच कठीण काम होतं. सिंगापूर डेलीच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी आयफोन खरेदी करत ढोलिया घरी परतले.


अॅपलने १२ सप्टेंबररोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस लॉन्च केले होते.