Google, Samsung, Realme, Redmi, OPPO : साधारण पंधरा वर्षे मागं गेलं असता जगाच्या कुठल्याशा टोकावर Android सुरु झालं आणि पाहता पाहता दर दिवसागणिक त्याचा प्रचार आणि प्रसार होत गेला. Android ला मिळालेली लोकप्रियता त्याच्या युजर्सच्या आकड्यावरून सहजगत्या लक्षात येते. फक्त भारतच नव्हे, तर जगातील अनेक मोबाईल याच ऑपरेटींग सिस्टीवर काम करतात. आता याच अँड्रॉईडसंदर्भात भारत सरकारनं काही सूचना युजर्सना केल्या आहेत. त्यामुळं या सूचनांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्य़ा या सूचना Android OS Version 11, 12, 12L आणि 13 वर काम करणाऱ्या सर्वच हँडसेटसाठी असल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला भारतात Android OSवर Google, Samsung, Realme, Redmi, OPPO, Vivo आणि OnePlus अशा कंपन्यांचे फोन ऑपरेट तेले जातात. त्यामुळं तुमच्याकडे यातील कोणताही फोन असेल तर सावध व्हा. 


CERT-In नं दिला इशारा, अजिबात दुर्लक्ष करू नका 


भारतातील मोबाईल धारक आणि त्यातही अँड्रॉईड युजर्सना इंटरनेट आणि व्हर्च्युअस दुनियेतील धोक्यापासून वाचवण्यासाठी इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पोंस टीम (CERT-In) च्या वतीनं काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. सरकारच्या वतीनं नुकताच मल्टीपल वल्नरबिलिटी (लूप होल/ त्रुटी) चा खुलासा झाला असून, याचा अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीमला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. या वल्नरबिलिटीच्या मदतीनं हॅकर्स अगदी सहजपणे तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. बँक खाते, ठेवी, आदिंवरही त्यांचा डोळा असू शकतो. 


हेसुद्धा वाचा : Google Pixel 8 सीरिजवर बंपर डिस्काऊंट, Buds आणि Watch ही मिळणार; Flipkart वर जबरदस्त ऑफर


 


य़ंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार हल्ली जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये बँकेचा तपशील, ओटीपी, खासगी माहिती असते. हॅकर्स यावर डोळा ठेवत असून, तुमची महत्त्वाची माहिती, फोटो किंवा बँकेतील पैसेही बळकावण्याचा हेतू यातून उदभवतो. 


हॅकर्सपासून वाचण्यासाठी मोबाईल ओएसकडून वेळोवेळी येणाऱ्या सिक्योरिटी अपडेटवर लक्ष ठेवा. अनेकदा अनावधानानं आपण अपडेट्सकडे लक्ष देत नाही. पण, यावेळी ही चूक महागात पडू शकते.