पुणे : हभप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय होत आहेत. इंदुरीकर समाजाची दुखरी नस धरतात, पण लोकांना हसरं करून ते सांगत असतात, म्हणून त्यांच्या कीर्तनाची लोकप्रियता वाढत आहे. इंदुरीकर अनोख्या शब्दशैलीत गावगाड्यातील साधी साधी, पण मजेदार उदाहरणं देतात. त्यांच्या कीर्तनात वास्तवतेला मोठा वाव असल्याने, अनेकांना ही उदाहरणं जिव्हारी लागतात, पण कटू असलेली ही उदाहरणांना, वास्तवतेचा किनारा असल्याने, हास्याचे फवारेच उडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कीर्तन ऐकणारा वर्ग तसा गावोगावी कमी होत चालला आहे, पण इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची अलोट गर्दी होत असते. महिला देखील मोठ्या प्रमाणात इंदुरीकरांच्या कीर्तनाला येतात, महिलांसमोरही वास्तविक गोष्टींचा दाखल ते सर्वांसमोर देत असतात. मुलींनी स्वसरंक्षण कसं करावं असं सांगत असताना, मुलींचं कौतुक करायलाही इंदुरीकर विसरत नाहीत.