स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का लावली जाते? जाणून घ्या यामागील कारण
तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची.
मुंबई : तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची. परंतु आत जे नवीन फोन येत आहेत. त्यामधील बॅटरी आपल्याला काढता येत नाही. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की असं का आहे? हे असं का केलं जातं? स्मार्टफोनमधील इनबिल्ट बॅटरीची सुरूवात सुप्रसिद्ध कंपनी ऍपलने सुरू केली होती, हळूहळू इतर मोबाइल कंपन्यांनीही त्यांच्या फोनसाठी ती स्वीकारली.
गॅजेट्सनोच्या रिपोर्टनुसार, याचे सर्वात मोठे कारण आहे फोनची सुरक्षा. या बॅटऱ्यांमध्ये इलेक्ट्रोड होते. इलेक्ट्रोड्समुळे बॅटरीमध्ये उष्णता वाढून शॉर्ट सर्किटचा धोका वाढला. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, शास्त्रज्ञांनी अशी बॅटरीची रचना केली की, न काढता जोग असेल आणि त्यामुळे सुरक्षा ही वाढेल.
इनबिल्ट बॅटरीची फोनमध्ये ठेवण्याचे दुसरे कारण म्हणजे, लूक आणि डिझाइन सुधारणे. सोप्या भाषेत समजण्यासाठी, काढता येण्याजोग्या बॅटरी प्लास्टिकच्या थराने झाकलेली असते. या प्लास्टिक कव्हरमुळे स्मार्टफोनचे वजन वाढते आणि स्मार्टफोन अधिक जागा व्यापतो. पण फोनमध्ये बॅटरी कायमस्वरूपी इनबिल्ट केल्यावर स्मार्टफोन्सचे वजन कमी करून ते स्लिम बनवता आले.
सध्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला जात आहे. या इनबिल्ट बॅटरी स्मार्टफोनला दीर्घकाळ पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्ले आणि चिपला अधिक शक्ती देतात. हे इतके शक्तिशाली आहे की ते 30 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.
अधिक चांगल्या फिचर्समुळे स्मार्टफोनच्या किंमतीही वाढत झाली आहेत. म्हणूनच बहुतेक वापरकर्त्यांना अशी बॅटरी हवी आहे, जी चार्ज होण्यास कमी वेळ घेईल आणि पॉवरला जास्त वेळ देईल. त्यामुळेच यात अशी पॉवरफुल बॅटरी टाकण्यात आली आहे जी खूप प्रभावी आहे.