मुंबई : सध्या पेट्रेल आणि डिजेलचे दर गगनाला भिडले आहेत, ज्यामुळे लोकांना वाहन वापरणं देखील कठीण होऊन बसलं आहे, कारण त्यामुळे लोकांचे महिन्याचे आर्थिक बजेट केलमडू लागले आहेत. त्यामुळे लोकं यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाकडे वळू लागले आहेत. परंतु ज्यांच्याकडे आधीच वाहन आहे त्यांनी करायचं काय असा प्रश्न लोकांना पडला आहे. यासाठी तुम्ही एकच करु शकता, ते म्हणजे वाहनांचं मायलेज वाढवणे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही म्हणाल ते कसं करायचं? यासाठी कदाचित तुम्ही मेकॅनिककडे देखील गेले असाल आणि बरेच लोक यासाठी पेट्रोल पंप मालकांना दोष देऊ लागले आहेत, की त्यांच्या पेट्रोल किंवा डिजेलमध्ये काही भेसळ असू शकते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की  कारचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते, त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे वाहनाचा वेग किंवा गती. हा वाहनाचा मायलेज वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे.


कारचे मायलेज देखील तिच्या वेगामुळे बदलले जाऊ शकते आणि ते वाढवले​किंवा कमी होऊ शकते.


अशा परिस्थितीत, तुम्हाला माहित आहे का की, कारचा वेग किंवा गती मायलेजवर कसा काय परिणाम करते आणि ते कसे बदलले जाऊ शकते? कारच्या मायलेजशी संबंधित काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


कारचे मायलेज कशावर आधारित आहे?


जेव्हाही तुम्ही कार चालवता, तेव्हा स्पीडसाठी पावरची आवश्यक असते आणि कारच्या मायलेजमध्येही हे महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, रोड लोड पॉवर टायरचे घर्षण (जे वारंवार ब्रेकिंग आणि व्हील बियरिंग्जमुळे प्रभावित होते), टायर फिरण्याची गती आणि हवेची घनता, फ्रंटल एरिया इत्यादीवर अवलंबून असते. ते जितके जास्त असेल तितके जास्त इंधन वापरले जाईल.


शहरात कार चालवताना आपण कदाचित जास्त किलोमीटर लांब जाऊ शकत नाही, परंतु वारंवार ब्रेक वापरल्यामुळे लोड पॉवर वाढते. ज्यामुळे कार मायलेज कमी देते.


मग गाडी कोणत्या वेगाने चालवायला हवी?
जेव्हाही तुम्ही गाडी चालवता, तेव्हा जर तुम्ही पुन्हा पुन्हा ब्रेक, क्लच इत्यादी वापरले नाहीत, तर तुमच्या कारचे मायलेज वाढते. पण, शहरात हे शक्य नाही. म्हणून असे मानले जाते की, जर तुम्ही शहरात कार चालवत असाल तर तुम्ही 40-50 च्या वेगाने गाडी चालवावी.


परंतु, जर तुम्ही हायवेवरती असाल आणि पाचव्या गिअरमध्ये गाडी चालवत असाल तर तुम्ही गाडीचा वेग जास्त ठेवावा. जर तुम्ही हायवे ड्राईव्हवर असाल आणि 80-90 वेगाने गाडी चालवत असाल, तर स्पीडनुसार तुमचा मायलेज वाढेल.


कोणत्या चुका करु नयेत


1. जर तुमची कार वेळोवेळी सर्व्हिस केली गेली नाही तर वाहनाच्या अंतर्गत भागांमध्ये समस्या येऊ शकतात. त्यामुळे गाडी जड धावू शकते. त्या काळात जास्त इंधन देखील वापरले जाते, ज्यामुळे मायलेज कमी होते.


2. तसेच, उन्हाळ्यात लोक बऱ्याचदा कार सुरू केल्यानंतर लगेच एसी चालू करतात. त्यावेळी इंजिन थंड होते आणि कार सुरू केल्यानंतर लगेच एसी चालवणे इंजिनवर अतिरिक्त दबाव टाकते, ज्यामुळे मायलेज कमी होते.


3. गतीनुसार गिअर बदला. यामुळे कारचे मायलेज वाढेल आणि इंजिनमधून अनावश्यक आवाज येणार नाही.