मुंबई : इंस्टाग्रामने आजकाल लोकांची सवय बनली आहे. मनोरंजन, उद्योग, व्यवसाय, व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी इंस्टाग्राम लोकप्रिय होत आहे. तसेच लोक इंस्टाग्रामवर पैसे कमावण्याचा देखील विचार करीत आहेत. जर तुम्हाला इंस्टाग्राम चालवण्याची आवड असेल तर तुम्ही देखील पैसे कमावू शकतात. या टीप्स वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Website Traffic Through Instagram
ज्या लोकांची वेबसाईट किंवा ब्लॉग आहे त्यांचे ट्रॅफिक इंस्टाग्रामवर देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर येणाऱ्या जाहिरातींमुळे तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर तुम्ही व्यवसाय प्रमोट करू इच्छित असाल तर इंस्टाग्राम हे प्राधान्यक्रमाने येणारे व्यासपीठ आहे. येथे तुम्ही तुमचे प्रोडक्टची विक्री करू शकता. 


Photography Photos with Watermark
ज्या लोकांना फोटोग्राफीची हौस आहे. ते फोटो इंस्टाग्रामवर विकून कमाई करू शकता.  Art Illustrations पासून ते व्हिडिओ आणि ऍनिमेशन, पेंटिंग, पिक्चर, सेल्फी, व्हिज्युअल कंटेंटच्या माध्यमांतून कमाई होऊ शकते. यासाठी तुम्ही पोस्ट करीत असेलेल्या पोस्टला WaterMark जरूर लावा. 


Earn Money Through Affiliate Marketing
तुम्ही Affiliate मार्केटिंगच्या माध्यमांतून पैसे कमाऊ शकता. Affiliate मार्केटिंग करताना तुमची ब्रॅंडची जाहिरात करण्यापेक्षा ब्रँडचे प्रोडक्ट विक्री करण्यावर फोकस करायला हवे. तुम्हाला त्या ब्रॅंडची प्रोडक्ट लिंक मिळेल त्यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामवर ती लिंक पोस्ट करा. जे लोक त्या लिंकच्या माध्यमातून खरेदी करतील. त्यातून मिळणाऱ्या कमिशनमधून तुम्हाला कमाई होऊ शकते.


sponsored posts
स्पॉंसर पोस्ट करण्याआधी तुमचे फॉलोवर्स वाढवण्यावर भर द्या. तुमचे फॉलोवर्स वाढले की, कोणत्याही ब्रॅंडसोबत भागिदारी करून त्यांचे प्रोडक्ट तुमच्या प्रोफाईलवरून प्रमोट करा. त्या प्रोडक्टसाठी ट्राफिक मिळाले तर नक्कीच तुमची कमाई होऊ शकते.