अमेरिका : ग्राहकांचा फेसबुकवरील वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जातात. आता फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे. 


काय असेल नवा अपडेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टोरीज' हा नवा आणि इंटरेसटिंग प्रकार आजकाल खूपच चर्चेमध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये हा पर्याय आहे. पण आता यांना एकमेकांशी लिंक करण्याचा प्रयत्न फेसबुक करणार आहे. 
आता इंस्टाग्रामची स्टोरी थेट व्हॉट्सअ‍ॅपवरही स्टेट्समध्ये दिसणार आहे. 



३० करोड युजर्स  


फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३० कोटी युजर्स 'इंस्टाग्राम स्टोरीज' आणि ' व्हॉट्स अ‍ॅप स्टेट्सचा वापर करतात. 


स्नॅपचॅटचे १७.३ युजर्स 


स्नॅपचॅटप्रमाणे ग्राहकांना सुविधा देण्यासाठी फेसबुकने इंस्टाग्रामचा पर्याय आणला. यामध्ये सतत नवनवे अपडेट्स देण्यात आले आहेत. सध्या स्नॅपचॅट युजर्सची संख्या १७.३ कोटी आहे. 


पॅरेंट कंट्रोल


१२ वर्षाहून लहान असणार्‍या  युजर्समध्ये फेसबुकचा वाप्र अधिक सुकर बनवण्यासाठी पॅरेंटॅल कंट्रोलचा ऑप्शन देण्यात  आला आहे. यानुसार फेसबुक मेसेंजर अ‍ॅपवरील नियंत्रण पालकांकडे राहणार आहे. 


नवं अ‍ॅप ६-१२ वयातील मुलांसाठी बनवण्यात आले आहे. पालक  मुलांची कॉन्टॅक्ट लिस्ट कंट्रोल करू शकणार आहेत.