मुंबई : तुम्ही इन्स्टाग्राम हे सोशल मीडियाapp वापरत असाल तुम्हाला लक्षात येईल की, इन्स्टाग्राम वापरताना तुमचा खुप वेळ जात असतो. त्यासाठी इन्स्टाग्रामने नवीन फीचर लॉंच केले आहे. इंस्टाग्रामने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की कंपनीने 'टेक अ ब्रेक' नावाचे नवीन फीचर लॉन्च केले आहे. या appद्वारे, ठराविक वेळेनंतर, वापरकर्त्यांना इन्स्टाग्राममधून ब्रेक घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.( Instagram New Feature)



कंपनीने ट्विट करून दिली माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामने ट्विट केले की, तुम्ही इंस्टाग्रामवर सकारात्मक वेळ घालवावा अशी आमची इच्छा आहे. आतापासून कोणताही वापरकर्ता इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडर जोडू शकतो.



मुलांच्या सुरक्षेबाबत टीका 


काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर मुलांच्या सुरक्षेबाबत टीका झाली होती. इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे किशोरवयीनांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचा आरोप या appवर केला जात होता. मंगळवारी कंपनीने 'टेक अ ब्रेक' फीचर लाँच केले.


या फीचरबाबत यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. कंपनीने सप्टेंबर महिन्यातच या फीचरची घोषणा केली होती.


त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले होते की, हे फीचर पहिल्यांदा युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि लवकरच सर्व यूजर्ससाठी सुरू केले जाईल.


हे फीचर कसे वापरावे?


तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन हे फीचर निवडू शकता. यामध्ये यूजर्सना असा पर्याय दिला जाईल की ते त्यांचे अॅप 10 मिनिटे, 20 मिनिटे किंवा 30 मिनिटे वापरू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला अॅपवरून रिमाइंडर मिळेल.