मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या युगात, जगभरात सर्वात जास्त ऍप वापरले जाते, ते इन्स्टाग्राम आहे. या फोटो शेअरिंग अॅपने नुकतीच एक घोषणा केली आहे. जे ऐकून युजर्सला देखील दु:ख बसला आहे. कारण Instagram लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवरून एक मनोरंजक फीचर काढून टाकणार आहे. हे फाचर काय आहे आणि ते काढून टाकल्याने युजर्स किंवा कंपनीवर काय फरक पडू शकतो हे आम्ही तुम्हाला जाणून घेण्यास मदत करणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Instagram ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर घोषणा केली आहे की, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 'Recent Tab' पर्याय काढून टाकणार आहेत.


या फीचरचा काय उपयोग होता किंवा तो कशासाठी वापरला जात होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा तुम्ही हॅशटॅगद्वारे पोस्ट शोधता तेव्हा तुम्ही अलीकडे पोस्ट केलेल्या पोस्ट 'Recents tab' द्वारे तपासू शकता. परंतु आता हा टॅब काढला जात आहे.


त्याचा वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल?


'Recents tab' काढून टाकल्याचा थेट परिणाम अशा वापरकर्त्यांवर होऊ शकतो, ज्यांनी अलीकडे Instagram वर एक पेज तयार केले आहे आणि ट्रेंडिंग हॅशटॅगद्वारे प्रसिद्ध होत आहे. ज्यामुळे त्यांनी आधी वापरलेला टॅग त्यांना दिसणार नाही.


हा टॅब काढून टाकल्यानंतर, हॅशटॅग शोधताना वापरकर्त्यांना आता फक्त दोन टॅब दिसतील, एक 'टॉप' आणि एक 'रील्स'.


सध्या, हा टॅब प्रत्येकासाठी काढला जात नाही


आम्ही तुम्हाला सांगतो की, इंस्टाग्रामने स्पष्ट केले आहे की सध्या 'Recents tab' सर्वांसाठी काढला जाणार नाही, कारण त्याची सध्या चाचणी सुरू आहे. प्लॅटफॉर्मला या हालचालीचा फायदा दिसला, तरच हे वैशिष्ट्य पूर्णपणे काढून टाकले जाईल.