Instagram करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पाहा काय म्हणाले CEO
Instagram upcoming update - इंस्टाग्राम काळानुरूप बदलंत चाललंय. सुरुवातील केवळ फोटो शेअरिंगसाठी असणाऱ्या या सोशल मीडिया ऍपने आता कात टाकलीय. टिकटॉकच्या भारतातील बंदीनंतर अनेकांनी इंस्टावरील रिल्सचा हात पकडून आपला कंटेन्ट बनवायला सुरुवात केली. शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅट इंस्टावर प्रचंड चालला देखील झाला. दरम्यान, आता इंस्टाग्राम एक मोठा बदल करणार आहे. आजपर्यंत इंस्टाग्रामने एवढा मोठा बदल केलेला नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे.

फोटोंची साईझ आता वाढवणार
नुकत्याच समोर येणाऱ्या रिपोर्ट्सनुसार इंस्टाग्राममध्ये फोटोंची साईझ आता वाढवणार आहे. कंपनी पुढील एक ते दोन आठवड्यात अल्ट्रा टॉल फोटो हे फिचर आणणार असल्याची माहिती आहे. सध्या उभ्या म्हणजेच 9:16 रेशो च्या फोटोंबाबत कंपनी मठ निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या नव्या अपडेटमुळे तुमचा इंस्टावरील युजर एस्पीरियंस पूर्णपणे बदलणार आहे.
भन्नाट युझर एक्सपीरियन्स
इंस्टाग्राम हे एक फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सोशल मीडिया ऍप आहे. सध्या इंस्टाचा वापर मोठ्या प्रमाणात फोटोंसोबत रिल्स बनवण्यासाठीही होतो. दरम्यान, आता कंपनी युजर एक्स्पीरियंस अधिक चांगला बनवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच इंस्टाग्राम आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. समोर येणाऱ्या रिपोर्ट्सनुसार इंस्टाग्राम आता फुल स्क्रीनला बढावा देण्याच्या तयारीत आहे.
CEO ऍडम मोसेरी म्हणतात...
एका कार्यक्रमात इंस्टाग्राम चे CEO ऍडम मोसेरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. इंस्टाग्राम अल्ट्रा टॉल 9:16 रेशोच्या फोटोची टेस्टिंग सुरु करणार आहे. याचाच अर्थ इंस्टावर आता फक्त फुल स्क्रीन फोटोच शेअर करत येऊ शकतील असा काढला तर वावगं ठरणार नाही.
instagram upcoming updates leaked by CEO adam mosseri tech news