मुंबई : Instagram : मेटा-मालकीचे सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्राम ( Instagram) तुम्हाला मोफत वापरता येणार नाही. आता तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण एखाद्या इन्स्टाग्राम यूजर्सला आपल्या आवडीच्या क्रिएटर्सचा कन्टेन्ट बघायचा असेल तर त्यासाठी त्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. (Instagram’s creator subscriptions nearing launch)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार सध्या इन्स्टाग्राम एका नव्या सबस्क्रिप्शन फीचरवर काम करत आहे. त्यामध्ये यूजर्सली कंटेट अ‍ॅक्सेस करण्यासाठी दर महिन्याला 89 रुपये मोजावे लागतील. यामुळे क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्सला फायदा मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्व क्रिएटर्ससाठी हे लागू असणार नाही. हे सगळे लिमिटेड कंपनी, खास कंटेन्टसाठीच असेल.


टेक क्रंचच्या एका अहवालनुसार, सध्या अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरच्या लिस्टिंगमध्ये इन-अ‍ॅप- पर्चेज दिसत आहे. त्यासाठी इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शन कॅटेगिरीही तयार करण्यात आली आहे. सध्यातरी 89 रुपये महिना शुल्क असणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हे फीचर यूजर्ससाठी आणले जाईल, तेव्हा त्यामध्ये बदल होऊ शकतो. कंटेट क्रिएटर्सला स्वतःचे सब्सक्रिप्शन शुल्क ठरवण्याचे पर्याय मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


 Instagram युजर्सने 89 रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतले तर त्याला एक ‘बॅज’ देण्यात येईल. जेव्हा आपण कोणतेही कमेंट किंवा मॅसेज करू तेव्हा प्रत्येक वेळी हा ‘बॅज’ युजरनेमच्या बाजूला दिसेल. त्यामुळे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला ओळखणे सोपे जाईल.


दरम्यान, इंस्टाग्राम ( Instagram) यूजर्स  मोठी कमाई करु शकणार आहेत. नवीन येणाऱ्या फीचरच्या माध्यमातून ही कमाई करु शकतील. इंस्टाग्राम एका फीचरवर काम करत आहे जे ओन्ली फॅन्सकडून प्रेरित असल्याचे दिसते. हे निर्मात्यांना कथा आणि लाइव्ह व्हिडिओ यासारख्या अनन्य सामग्री अनलॉक करण्यासाठी फी भरून अतिरिक्त पैसे कमविण्याची अनुमती देईल.