इंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी
ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचे (ट्राय) अध्यक्ष आर एस शर्मा यांनी इंटरनेटच्या वापराबाबत वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्वांना समान इंटरने आणि ते वापराचे स्वातंत्र्य मिळायला हवे, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
इंटरनेट वापराच्या सर्वांना समान संधी हव्या
शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, इंटरनेट ही कोणाची मक्तेदारी नाही. त्यामुळे सर्वांना इंटरनेट वापराच्या समान संधी मिळायला हव्या. कोणीही त्यावर नियंत्रण मिळवू नये तसेच, चौकीदाराप्रमाणे कोणीही इंटरनेटच्या वापरावर मर्यादाही घालू नये. विशेष असे की ट्रायने नेट निरपेक्षतेबाबत आपल्या सर्व शिफारशी आज लागू केल्या. यात एक प्रकारे इंटरनेट वापराबाबत स्वातंत्र्यच दिले गेले आहे. तसेच, यापुढे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना इंटरनेट पोहोचविण्याबाबत कोणत्याही प्रकारची मर्यादाही घालता येणार, नसल्याचे ट्रायने म्हटले आहे.
इंटरनेट हे खुले व्यासपीठ
दरम्यान, शर्मा यांनी म्हटले की, नवोन्मेष, सार्टअप, ऑनलाईन देवानघेवान, विविध सरकारी तसेच, डिजिटल इंडियाचे कार्यक्रम आदींसाठी इंटरनेट हे एक खुले व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला मुक्त ठेवण्यात येत आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, आमच्याकडे 50 कोटी इंटरनेट वापरणारे ग्राहक आहेत. 1.3 अरब इतकी लोकसंख्या असलेल्या या देशात मोठमोठ्या गोष्टी इंटरनेटवर घडतील. त्यामुळे हे व्यासपीठ मुक्त असणे महत्त्वाचे आहे.
इंटरनेटवर कोणाचीही मक्तेदारी चालणार नाही
ट्रायने आज नेट निरपेक्षतेबाबतच्या शफारशी सांगितल्या. या सिफारशींनुसार ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही. तसेच, इंटरनेट वापराबाबतही कोणाला भेदवाव करता येणार नसल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे.