७ हजारांत लाँच झाला ड्युअल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन
इंटेक्स कंपनीने मंगळवारी नवा ड्युअल सेल्फी कॅमेरा लाँच केला. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Intex ELYT Dual असं ठेवलंय.
मुंबई : इंटेक्स कंपनीने मंगळवारी नवा ड्युअल सेल्फी कॅमेरा लाँच केला. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Intex ELYT Dual असं ठेवलंय.
स्मार्टफोनची किंमत
ग्राहक हाया स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आलीये. स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून खरेदी करु शकतात. हा स्मार्टफोन शँपेन आणि ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहे.
हे आहेत फीचर्स
हा स्मार्टफोन खासकरुन सेल्फीप्रेमींसाठी बनवण्यात आलाय. यात एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल असे कॅमेरे देण्यात आलेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने डीएसएलआर सारखे फोटोज काढता येऊ शकतात असा दावा कंपनीने केलाय. फ्रंट आणि रेयर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये ऑटोफोकस सपोर्ट देण्यात आलाय.
डिस्प्ले आणि मेमरी
ELYT Dualमध्ये २.५ कर्व्हड ग्लाससह ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. तसेच यात २ जीबी रॅम, १.३ गिगाहर्ट्झ क्वॉड-कोर स्पेडट्रम ९८५० चिपसेट देण्यात आलाय. यात १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आलीये.
हा अँड्रॉई़ड ७.० नॉगटवर चालतो. यात २४०० एमएएच बॅटरी देण्यात आलीये. कनेक्टिविटीसाठी यात ४ जी volte, ब्लूटूथ, वायफायसारखे पर्याय आहेत.