Whatsapp ने आपण लवकरच युजर्सला दिली जाणारी एक सुविधा हटवणार असल्याची घोषणा केली होती. मार्च महिन्यात Whatsapp कडून ही माहिती देण्यात आली होती. यापुढे Whatsapp युजर्स दुसऱ्या एखाद्या युजर्सच्या Whatsapp Profile Photo चा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या फिचरला Screenshot Blocking - Profile Photo असं नाव देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या आगामी फिचर्सवर लक्ष ठेवणारी वेबसाईट WA Beta Info ने दिलेल्या माहितीनुसार, Whatsapp नवी अपडेट आणत आहे. यामद्ये IOS युजर्स दुसऱ्या युजर्सच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. 


Android Beta व्हर्जनमध्ये अपडेट


अँड्रॉईडमधील Whatsapp Beta व्हर्जनमध्ये सध्या युजर्स दुसऱ्या युजरच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत आहेत. सध्या हे फिचर iOS प्लॅटफॉर्मवर आलेलं नाही. पण लवकरच त्याचं टेस्टिंग सुरु होणार आहे. 



हे फिचर नेमकं कसं काम करणार?


WA Beta Info ने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये जर प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल हे दाखवण्यात आलं आहे. तुमच्या स्क्रीनवर 'Screen Capture Blocked' असा संदेश येईल. याखाली लिहिण्यात आलं आहे की, प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्यात आला आहे. हा स्क्रीन कॅप्चर आता ब्लॉक झालं आहे. 


WhatsApp युजर्सना वैयक्तिक माहितीवरील नियंत्रण देणार


WA Beta Info ने लिहिलं आहे की, आमच्या मते कंपनी यासह आपल्या युजर्सला त्याच्या खासगी माहितीवर नियंत्रण देत आहेत. तसंच या फिचरसह प्रोफाईल फोटोचा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न आहे. या फिचरमुळे धोका पूर्णपणे तर टळणार नाही. पण प्रायव्हसी कंट्रोलसाठी हे चांगलं पाऊल आहे. 


WhatsApp वर येणारं हे Screenshot Blocking - Profile Photo फिचर सध्या डेव्हलप केलं जात आहे. सर्व चाचण्या झाल्यानंतर आता स्टेबल व्हर्जनसाठी जारी कऱण्यात आलं आहे. आता हे स्टेबल व्हर्जन कधी लाँच होणार यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही.