iPhone 13 Pro मध्ये धमाकेदार फिचर्स, जाणून घ्या
आयफोन 13 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल मॅट ब्लॅक ऑप्शनसह
नवी दिल्ली : ऍपल(Apple) आयफोन 13 लाईनअप लॉन्च करण्याची योजना आखत आहे. आयफोन 13 प्रो (iPhone 13 Pro) सुधारित पोर्ट्रेट मोडसह नवीन मॅट ब्लॅक ऑप्शनमध्ये येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यावर्षी मॅट ब्लॅक ऑप्शन्स असलेले फोन यावर्षी लाँच केले जाणार नाहीत.
Everything ApplePro या यूट्यूब चॅनेलसोबत बोलताना मॅक्स वनबॅकने याची माहिती दिली. आयफोन 13 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल मॅट ब्लॅक ऑप्शनसह येणार आहेत.
याला नवीन स्टेनलेस स्टीलचे कोटिंग असेल. याशिवाय ऍपल ब्रॉंझ आणि ऑरेंज रंगाचा असू शकतो. या पर्यायांसह येणारा फोन यावर्षी लॉन्च होणार नसल्याचेही सांगण्यात येतंय.
नवीन प्रो आयफोनवरील पोर्ट्रेट मोड लीडर (LIDAR) वर जास्त अवलंबून असेल. सध्या कमी प्रकाशात चांगल्या फोटोग्राफीसाठी आयफोन 12 प्रो, प्रो मॅक्स आणि आयपॅड प्रोचा वापर केला जातो.
ऍपल आयफोन 13 मॉडेल या वर्षाच्या अखेरीस बाजारात येणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये फेस आयडी व्यतिरिक्त प्रमाणीकरणासाठी डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात येईल.
आयफोन 13 ची वैशिष्ट्ये
याव्यतिरिक्त, आगामी आयफोन 13 मालिकेत क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन एक्स 60 5 जी मॉडेमचा वापर असेल.
5 एनएम प्रक्रियेवर तयार, एक्स 60 आयफोन 12 मॉडेलमध्ये वापरल्या जाणार्या 7 एनएम-आधारित स्नॅपड्रॅगन एक्स 55 मॉडेमपेक्षा लहान फूटप्रिंटमध्ये उच्च उर्जा क्षमता पॅक आहे.