iPhone 14 Crash Detection Feature: स्मार्टफोन निर्मात अ‍ॅपल कंपनीनं नुकताच आयफोन 14 सीरिज लाँच केली आहे. सर्व मॉडेल्समध्ये विशेष क्रॅश डिटेक्शन फीचर देण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने, अपघात किंवा कार क्रॅश झाल्यास फोन आपोआप अलर्ट करेल आणि आवश्यक असल्यास आपत्कालीन कॉल देखील करेल. फोन सीरीज लाँच केल्यानंतर, आता एका YouTuber ने iPhone 14 चे हे वैशिष्ट्य वापरून पाहिले आहे. या फीचरची चाचणी युट्युबरने कार क्रॅश करून केली आहे. हे फीचर कसं कार्य करते? पाहण्यासाठी त्याची चाचणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  YouTuber, TechRax ने iPhone 14 च्या क्रॅश डिटेक्शन फीचरची चाचणी केली. या YouTuber ने 2005 च्या Mercury Grand Marquis सेडानच्या पुढच्या सीटच्या हेडरेस्टवर iPhone 14 Pro बसवला. त्यानंतर त्याचे वाहन काही जुन्या वाहनांसोबत क्रॅश केलं. या YouTuber ने रिमोट कंट्रोल्ड कारच्या मदतीने हा क्रॅश केला. जेणेकरून ते क्रॅश डिटेक्शन फीचर काम करते की नाही. हा अपघात होताच, नवीन आयफोन 14 प्रो ने डिटेक्ट केला. यानंतर आपत्कालीन क्रमांक देखील डायल केला. कारला दोनदा अपघात झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, पहिल्या वेळी वेग कमी होता पण दुसऱ्यांदा अतिशय वेगाने अपघात झाला.



अपघातानंतर दहा सेकंदात, आयफोन 14 चे वैशिष्ट्य सक्रिय झाले. एक अलार्म वाजला आणि स्क्रीनवर फ्लॅश अलर्ट देखील दिसत होता. याव्यतिरिक्त, स्क्रीनवर एक आपत्कालीन स्लाइडर देखील दिसत होता, ज्याच्या मदतीने युजर्स एकतर कॉल करू शकतो किंवा अलर्ट डिसमिस करू शकतो. यानंतर, पुढील 20 सेकंद प्रतीक्षा केल्यानंतर, फोन आपोआप कॉल आपत्कालीन सेवांशी जोडला गेला.