iPhone 14 Pro मध्ये सिमकार्ड नसणार आणि...! लाँचपूर्वी फोनबाबत नवं अपडेट
नव्या आयफोनमध्ये काय असेल? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे.
iPhone 14 Pro eSIM Technology: अॅपलच्या नव्या आयफोन सीरिजबाबत मोबाईलप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते. नव्या आयफोनमध्ये काय असेल? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. अॅपल (Apple iphone Launch Event) आपल्या आयफोन 14 सीरिजचं लाँचिंग उद्या म्हणजेच 7 सप्टेंबर 2022 रोजी करणार आहे. यासाठी एक मेगा इव्हेंट आयोजित केला असून हा कार्यक्रम थेट स्ट्रीमद्वारे पाहता येईल. असं असलं तरी लीक आणि मीडिया रिपोर्ट्समधून या सीरिजबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. या सीरीजच्या प्रो मॉडेल असलेल्या आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro) बद्दल एक मोठे अपडेट समोर आलं आहे. या फोनमध्ये सिम कार्ड नसणार आहे.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या यांच्या रिपोर्टनुसार, आयफोन 14 प्रो यावेळी ई-सिम तंत्रज्ञानासह लाँच केलं जाणार आहे. अॅपल या तंत्रज्ञानावर खूप गांभीर्याने काम करत आहे. मार्क गार्मन यांनी सांगितलं की, यावेळी आयफोन 14 प्रोमध्ये फिजिकल सिम कार्डची सुविधा नसेल.
दुसरीकडे, या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत एक नवीन अपडेट देखील आले आहे. अॅपल आयफोन 14 प्रोच्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये मोठे अपग्रेड करू शकते. iPhone 14 Pro ची बॅटरी क्षमता आयफोन 13च्या Pro मॉडेलपेक्षा चांगली आणि मोठी असेल, असं बोललं जात आहे. आयफोन 14 प्रो 3200mAh बॅटरीसह येऊ शकते.