Apple iPhone 15 Pro : लक्झरी आणि क्लास या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या अनेक टेकसॅव्ही मंडळींना सध्या प्रतीक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे अॅपलच्या आयफोन 15 ची. याच Apple iPhone 15 Pro बद्दलची महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्याचे CAD रेंडर समोर आले असून, (Apple Flagship) अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये (Smartphone) येत्या दिवसांत काही महत्त्वाचे फिचर्स बदललेले दिसतील. ही बातमी आयफोन प्रेमींना सध्या प्रचंड आनंद देणारी ठरत आहे. आता यामधील फिचर्स नेमके कशा पद्धतीनं नव्यानं समोर येतील हे तुम्हीसुद्धा एकदा पाहूनच घ्या. 


iPhone 15 Pro टायटेनियम? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोनच्या लाँचविषयीच्या चर्चांना सुरुवात होताच अनेक सोशल मीडिया हँडल्सवरून त्याच्या फिचर्सचा उलगडा केला जातो. अशाच एका Unknownz21 नावाच्या युजरनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिथं त्यानं फोनचा खालचा भाग दाखवला आहे. इथं USB-C पोर्ट स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय स्पीकर ग्रिल्ससुद्धा दिसत आहेत. USB-C मध्ये ट्रांझिशनशिवाय Apple E75 लाइटनिंग कंट्रोलरलासुग्धा Apple E75 लाइटनिंग कंट्रोलर E85 पोर्टनं बदलू इच्छित असल्याची माहिती समोर आली आहे. 


हेसुद्धा वाचा : Smartwatch : स्मार्टवॉचमुळे डेटा चोरीला जाणार? स्मार्टवॉचवर होऊ शकतो सायबर हल्ला?


अॅपलच्या या नव्या फोनमध्ये टायटेनियम डिझाईनची एक झलक पाहायला मिळते. सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी अॅपलकडून iPhone 15 प्रो सीरीजसाठी स्टेनलेस स्टीलपेक्षा टायटेनियमचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळं येणाऱ्या आयफोनमध्ये अल्ट्रा मॅट फिनिश पाहायला मिळू शकते. ज्याचे परिणाम अॅपलच्या दरांवरही स्पष्टपणे दिसून येऊ शकतात. 



iPhone 15 Pro मध्ये युएसबी पोर्ट? 


युरोपियन युनियनच्या नियमानुसार प्रत्येक कंपनीला त्यांच्या डिव्हाईसमध्ये USB-C पोर्ट असणं अपेक्षित आहे. ज्यामुळं येणाऱ्या आयफोनच्या नव्या मॉडेलमध्ये हा पोर्ट देण्याच्या तयारीत अॅपलही असल्याचं कळत आहे. सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार नवा आयफोन नव्या प्रकारच्या चार्जिंग पोर्टसोबतच विक्रीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा अॅपलकडूनही कोणत्याही माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही.