Smartwatch : स्मार्टवॉचचा वापर वेळ पाहण्यासोबतच आपल्या आरोग्यासंबंधित माहितीसाठी होतो. मोबाईलमधील मेसेज, कॉल, जीपीएस आणि सोशल मीडियाचा वापरसुद्धा स्मार्टवॉचने होऊ शकतो. मात्र, हे घड्याळ मोबाईल आणि अॅप्सशी जोडलेलं असल्याने त्यावर सायबर हल्ल्याची भीती आहे. असा दावा आता केल्याने स्मार्टवॉच वापरण्याचे धाबे दणाणले आहेत.
स्मार्टवॉचमुळे खरंच असं होत असेल तर काय करायला हवं...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र यामागे नेमकं काय सत्य आहे, जाणून घेऊया
स्मार्टवॉचचा जीपीएस तुमच्या हालचालींचा डेटा एकत्रित करतो. तुम्ही केव्हा, कुठे आणि किती वाजता निघालात हे त्यातून माहिती कळते. यावर हॅकर्स तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीनं हे धोकादायक ठरू शकतं.
ही माहिती तुमच्या मोबाईलमधून कंपनीच्या सर्व्हरपर्यंत सतत जात असते. या स्थितीत सायबर हल्ले दोन प्रकारांनी होऊ शकतात. पहिला हॅकर्स तुमच्या मोबाईलच्या डेटाची चोरी करू शकतात. हा डेटा थर्डपार्टी अॅप्सपर्यंतसुद्धा पोहोचतो.
आम्ही केलेल्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. त्यामुळे तुम्ही स्मार्टवॉच वापरत असाल तर काळजी घ्या.