Apple iPhone 15 Series:  जगभरात अनेक जण Apple iPhone चे चाहते आहेत. सर्वांनाच Apple iPhone च्या लेटेस्ट Series ची प्रतिक्षा असते. सध्या मार्केटमध्ये iPhone 14 धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच  iPhone 15 लाँच होणार आहे. यामुळे आयफोन प्रेमींना आता Apple iPhone 15 Series ची प्रतिक्षा लागून राहिली आहे. Apple iPhone 15 कसा असेल? यात काय नविन फिचर्स असतील? याची किंमत किती असेल असे अनेक प्रश्न आयफोन प्रेमींना पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या Apple चा iPhone 14 हा फोन ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यापाठोपाठ आता Apple कंपनीने Apple iPhone 15 Series लाँच करण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त एका गॅजेट रिपोर्टने दिले आहे. या नवीन  iPhone 15 Series अंतर्गत iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे दोन स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतात. 


MacRumors ने Apple iPhone 15 Series च्या लाँचिंगचे वृत्त दिले आहे.  MacRumors च्या रिपोर्टनुसार, Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max टायटॅनियम फ्रेम्स, हॅप्टिक फीडबॅक, सॉलिड स्टेट बटण आणि जादा रॅमसह या सारखे एकापेक्षा एक जबरदस्त फिचर्स असणार आहेत. 


 iPhone 15 मध्ये थ्री-स्टॅक बॅक कॅमेरा असेल


9To5Mac च्या दुसर्‍या अहवालात  iPhone 15 च्या कॅमेरा फिचर्सबाबात माहिती देण्यात आलेय.  iPhone 15 आणि iPhone 15 Plus कंपनी कॅमेरे अधिक अपग्रेड करणार आहे. रिपोर्टनुसार,  iPhone 15  मध्ये तेच कॅमेरा सेन्सर असू शकतात जे iPhone 14 Pro मॉडेलसाठी राखीव होते. iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये तीन-स्टॅक बॅक कॅमेरा असू शकतो, त्यात 48-मेगापिक्सलचा वाइड लेन्स असू शकतो, याशिवाय, iPhone 15 मॉडेल ऑप्टिकल झूमसाठी टेलिफोटो लेन्सस किंवा LiDAR स्कॅन असणार की नाही हे गुलदस्त्यात आहे.


iPhone 15 च्या  स्क्रीनचा आकार मोठा असणार


Tipster yeux1122 च्या अहवालानुसार, Apple विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी iPhone 15 च्या  स्क्रीनच्या आकाराबाबत भाष्य केले आहे. मोठ्या स्क्रीनचा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी Apple चा आगामी iPhone 15 Plus बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. कारण, या फोनमध्ये मोठा डिस्प्ले मिळणार आहे. 


iPhone 15 ची किंमत किती असेल?  


महागडे फोन अशी आयफोनची आणखी एक वेगळी ओळख आहे.  iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे बजेट फोन असण्याची शक्यता आहे. सध्याच्या iPhone 14 Plus ची स्टार्टिंग प्राईज 128GB स्टोरेज बेस मॉडेलसाठी 89,900 रुपये आहे. तर,  iPhone 14 ची स्टार्टिंग प्राईज 79,900 रुपये इतकी आहे. रिपोर्टनुसार, iPhone 15 सीरीज iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे बेस मॉडेल जुन्या सीरीज iPhone 14 आणि iPhone 14 Plus पेक्षा स्वस्त असू शकतात असा देखील दावा केला जात आहे.