मुंबई : सध्या iPhone हा स्मार्टफोनपैकी असा फोन आहे, जो खूपच लोकप्रिय आहे. ऍपलचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, आयफोन्स खूप महाग आहेत, पण सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. म्हणूनच तर त्याची किंमत इतकी जास्त आहे. iphone कडे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील पाहिलं जातं. परंतु असं असलं तरी, iphone ची बॅट्री सर्वच स्मार्टफोनच्या तुलनेत लवकर ड्रेन होते. ज्यामुळे काही लोक हा फोन घेण्या आधी बराच विचार करताता आणि बॅट्री लवकर ड्रेन होने हा या फोनचा निगेटेव्ह मुद्दा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही देखील iphone युजर्स असाल आणि तुम्ही देखील या समस्येनं त्रस्त असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा फोन पुन्हा-पुन्हा चार्ज करावा लागणार नाही.


आयफोनची बॅटरी लवकर का संपते?


हा प्रश्न कदाचित प्रत्येक आयफोन वापरकर्त्याच्या मनात येईल की अॅपलचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सर्वच बाबतीत जबरदस्त आहे, मग फोनची बॅटरी लवकर का संपते?


आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक कारणे असू शकतात, परंतु आयफोनची बॅटरी डिस्चार्ज होण्याचे मुख्य कारण म्हणजे फोनमध्ये डाउनलोड केलेले अॅप्स. हे अॅप्स फोनची मेमरी तर घेतातच पण फोनची बॅटरीही संपवतात.


आता बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी हे अॅप्स डिलीट करता येणार नाहीत, पण आम्ही तुमच्यासाठी अशा काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही फोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.


फोन सेटिंग्ज बदला
टिकटोकर किडामाने त्यांच्या एका व्हिडीओमध्ये असे काही मार्ग सांगितले आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.


सर्वप्रथम, तुमच्या फोनची सेटिंग्ज उघडा, त्यानंतर 'जनरल' वर क्लिक करा आणि 'बॅकग्राउंड अॅप रिफ्रेश' हा पर्याय बंद करा. यानंतर, सेटिंग्जच्या मुख्य पृष्ठावर जा, त्यानंतर 'बॅटरी' वर जा आणि 'ऑप्टिमाइज्ड बॅटरी लाइफ' हा पर्याय चालू करा आणि अशा प्रकारे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपणार नाही.


या युक्त्यांमुळे आयफोनची बॅटरीही वाढेल
या ट्रीक व्यतिरिक्त, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्यापासून रोखण्यासाठी लक्षात ठेवू शकता. सर्वप्रथम तुमचा फोन नेहमी 'ऑटो-ब्राइटनेस' वर ठेवा. या वैशिष्ट्यासह, फोन आजूबाजूच्या प्रकाशानुसार ब्राइटनेस पातळी समायोजित करेल आणि अशा प्रकारे कमी बॅटरी वापरेल.


जर तुम्हाला 'ऑटो-ब्राइटनेस' फीचर वापरायचे नसेल, तर तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी कमी ठेवू शकता जेणेकरून ते कमी बॅटरी वापरेल.


याशिवाय तुमच्या फोनमध्ये 'रेज टू वेक' फीचर असेल, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. हे फीचर बंद करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ देखील वाढवू शकता. तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये 'डिस्प्ले आणि ब्राइटनेस' या पर्यायामध्ये हे फीचर मिळेल.