iPhone price : अॅपलनं भारतातलं पहिलं रिटेल स्टोर (Apple Store) मुंबईत लाँच केलं आहे. 100 आयफोन एक्सपर्टची भरती या स्टोअरमध्ये करण्यात आलीय. आयफोन प्रेमींसाठी खास अॅपलनं मुंबईत (BKC, Mumbai) हे स्टोअर लाँच केलंय. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल (Jio World Drive Mall) असं या स्टोरला नाव देण्यात आलं आहे. यानंतर दुसरं अॅपल स्टोर दिल्लीतल्या साकेत इथं येत्या 20 एप्रिलला खुलं होणार आहे. 2020 मध्ये अॅपलने ऑनलाईन स्टोर भारतात लाँच केलं होतं. त्याचवेळी भारतात ऑफलाईन स्टोर उघडण्याचं कंपनीचं प्लानिंग सुरु झालं होतं. भारतात अॅपल प्रोडक्टसची अनेक दुकानं असताना अॅपल स्टोर उघडल्याने काय फायदे मिळणार असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. मुंबईतल्या आयफोन स्टोअरमुळे मुंबईसह देशभरात आयफोन स्वस्त (iPhone Price) होणार असा दावाही केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

iPhone स्टोर्सचे फायदे
आजपर्यंत अॅपलचं कोणतंही प्रोडक्ट लाँच झाल्यानंतर थेट भारतात पोहचत नव्हतं. भारतात आयफोनचं प्रोडक्ट यायला बराच वेळ लागत होता. मुंबईतल्या आयफोन स्टोअरमुळे आता अॅपलचं प्रत्येक प्रोडक्ट लाँचिंगच्याच दिवशी उपलब्ध होणार आहे. iPhone 15 ही लाँचिंगच्या दिवशी खरेदी करता येणार आहे. सोबतच एका छताखाली अॅपलची सारी प्रोडक्ट्स मिळणार आहेत. कंपनीने मुंबई स्टोरसाठी 100 एक्स्पर्टची भरती केली आहे. ही टीम 20 हून अधिक भाषांमध्ये ग्राहकाशी संवाद साधू शकतात. 


iPhone स्वस्त होणार? 
जगात जितकं iPhoneचं प्रोडक्शन होतं त्यापैकी केवळ 5% आयफोन भारतात बनतात. 4 वर्षात iPhoneचं भारतातलं प्रोडक्शन वाढवण्याचे कंपनीचे प्लॅन्स आहेत. iPhoneचे पार्ट्स भारतात बनत नाहीत. iPhoneचे पार्ट्स भारतात आयात करण्यावर 20% शुल्क लागतं. मुंबईतल्या स्टोअरमुळे आयात शुल्क नजीकच्या काळात कमी होऊ शकतं. मात्र कंपनीकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही


अॅपल स्टोरमध्ये एक्स्क्ल्यूझिव्ह सर्व्हिस
अॅपल स्टोरमध्ये ग्राहकांना एक्स्क्ल्यूझिव्ह सर्व्हिस मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच अॅपलचं प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करता येणार आहे. अॅपलचं नवं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची किंवा परदेशातून मागण्याची गरज आता उरणार नाही. अॅपल ट्रेड-इनद्वारे तुम्ही तुमचं जूनं गॅझेट बदलू शकता किंवा अॅपलच्या नवा गॅझेटवर सुट मिळवू शकता. 


आयफोन पार्ट्सचं आयात शुल्क वाचवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कंपनीनं 4 वर्षांचा रोडमॅप आखलाय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढच्या 4 वर्षात जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा भारतात बनलेला असेल. त्यामुळे भारतात स्टोअर 
ओपन झालं असलं तरी आमच्या पडताळणीत आयफोनच्या किंमती तातडीनं कमी होणार नसल्याचं सत्य समोर आलंय. ऑनलाई ऑर्डर केल्यास ग्राहकाला आता थेट अॅपल स्टोरमधून त्यांचं प्रोडक्ट मिळणार आहे. 


आयफोन पार्ट्सचं आयात शुल्क वाचवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कंपनीनं 4 वर्षांचा रोडमॅप आखलाय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढच्या 4 वर्षात जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा भारतात बनलेला असेल. त्यामुळे भारतात स्टोअर 
ओपन झालं असलं तरी सध्या आयफोनच्या किंमती तातडीनं कमी होणार नाहीत.