भारतीयांना लवकरच आयफोन स्वस्तात मिळणार?
अॅपलने आयफोन ११ लॉन्च केला आहे. भारतात आयफोनची बुकिंग देखील सुरू झाली आहे. अनेकांचं आयफोन घेणं एक स्वप्न असतं. तर काहींनी
मुंबई : अॅपलने आयफोन ११ लॉन्च केला आहे. भारतात आयफोनची बुकिंग देखील सुरू झाली आहे. अनेकांचं आयफोन घेणं एक स्वप्न असतं. तर काहींनी आयफोन एकदा वापरला की ते अँड्रॉईडला हातही लावत नाहीत. आयफोन मात्र सर्वांनाच आवडतो, असं देखील नाही. कारण आयफोन महाग असतो. हे आयफोन खरेदी करताना सर्वात महत्वाचं ठरतं.
पण आता अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी याबाबतीत भारतीयांना खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी सोन्याची अशा भारतीयांसाठी आहे, ज्यांना आयफोन वापरायला आवडतं.
आयफोनचे सीईओ टिम कूक यांनी आयफोन भारतीयांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा प्लान बनवला आहे. आयफोन इतर देशांपेक्षा जवळजवळ २० हजारांपर्यंत स्वस्त करण्याची ही कल्पना आहे. प्रत्यक्षात किमती कमी केल्यावरच समजू शकेल, की किंमती नेमक्या किती केला आहे.
पण यात सर्वात महत्वाचं हे समजून घ्या की, यात आताच लॉन्च झालेला आयफोन ११ चा समावेश नाही. तो आहे त्याच किमतीला मिळणार आहे. पण याआधी लॉन्च झालेल्या आयफोनच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
दक्षिण भारतात फॉक्सकॉन प्लान्टमध्ये आयफोन असेंम्बल करण्याचं काम आता सुरू झालं आहे, यामुळे आयफोनला इतर देशांच्या तुलनेत आयफोन भारतात स्वस्त करणे शक्य होणार आहे. फॉक्सकॉन सर्वात मोठी आयफोन निर्माता कंपनी आहे.
तेव्हा आताच आयफोन घेण्याच्या विचारात असाल, तर थोडं थांबा कारण मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच आयफोन वापरणाऱ्यांसाठी आणि आयफोन बजेटमध्ये आला तर निश्चित घेऊ अशी अपेक्षा असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.