मुंबई : लहान आकारांचे स्मार्ट फोन्स आवडणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लहान आकाराचे फोन शोधण्यासाठी इतर कंपन्यांकडे जाण्याची तुम्हाला गरज लागणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण अॅप्पल लवकरच आयफोनचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. याची स्क्रीन लहान असणार आहे. 


आयफोन एसई २ 


या फोनचे नाव आयफोन एसई २ असे असणार आहे. हा आयफोन एसई चे सेकंड जनरेशन असणार आहे. 


कधी येतोय ?


आयफोन एसई हा फोन २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यातच बाजारात येणार आहे. 


चीनमधील एका वृत्तानुसार आयफोन एसई २ हा आयफोन एसई चे रिप्लेसमेंट असणार आहे. 


ज्या युजर्सना छोच्या स्क्रीन्स आवडतात, त्यांना हा फोन फायदेशीर ठरणार आहे.


फिचर्स


आयफोन एसईमध्ये ४ इंचचा डिस्प्ले आहे.


नवीन आयफोन ७ आणि आयफोन ८ मध्ये ४.७  इंच इतका लहान आहे.


'अॅप्पल विवादात'


काही कारणामूळे 'अॅप्पल' विवादांमध्ये होती. प्रोडक्शनमधून होत असलेल्या दिरंगाईमूळे अॅपलची सप्लायर फॉक्सकॉन कथित रुपात हजारो विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती काम करवून घेत होती, तसेच ओव्हरटाईमही करवून घेतला जात होता असे वृत्त होते.


किती किंमत ?


या फोनची किंमत २९ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.