iPhone News: भारतात आयफोनचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच अॅपल कंपनीने आयफोन 15 लाँच केला होता. मात्र, लाखाच्या घरात असलेले आयफोन घेणे प्रत्येकालाच परवडत नाही. पण आता लवकरच खिशाला परवडणाऱ्या आयफोन लाँच होण्याची शक्यता आहे. MacRumorsने दिलेल्या सूत्रानुसार, लवकरच अॅपल कंपनी iPhone SE 4 लाँच करण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये हा आयफोन बाजारात येऊ शकतो.  iPhone 14 सारखीच डिझाइन या फोनमध्ये देण्यात येऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे. 


वजनही असेल कमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 iPhone 14 मध्ये असलेले फेस आयडी फिचर्स आणि USB-C पोर्टदेखील फोनमध्ये देण्यात येऊ शकतो. सूत्रांनुसार, Apple iPhone 14 चेसिसच्या रिवाइज्ड अॅडिशनसोबतच एक नवा iPhone SE लाँच करण्यात येऊ शकतो. यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आणि नॉचसोबतच ट्रूथेप्थ कॅमरा सेटअप देण्यात आला आहे.  MacRumors ने दिलेल्या माहितीनुसार, iPhone SE चे वजन 165 ग्रॅम असू शकते. जे iPhone 14 पेक्षा 6 ग्रॅमने कमी आहे. म्हणजेत तुलनेने आयफोन एसई वजनाने कमी आणि अधिक आरामदायी आहे. 


दमदार कॅमेरा सेटअप


iPhone SE 4 आणि iPhone 14 च्या यांच्यात तुलना केल्यास त्यातील गोष्ट म्हणजे रेयर कॅमेरा सिस्टम ही असेल. रिपोर्टनुसार, iPhone SE 4 मध्ये फक्त एक रेयर लेंस असेल, iPhone 14 मध्ये दोन रियर लेंस असतील. तसंच फोनमध्ये 48 MPचा कॅमेरा देण्यास येऊ शकतो. लेटेस्ट एसई मॉडेल फोनमध्ये आयफोन 15 प्रो प्रमाणेच अॅक्शन बटणदेखील असेल. 


रिपोर्टनुसार, आयफोन SE 4 मध्ये यावेळी मोठे अपग्रेड देण्यात येतील. हे USB-C पोर्ट असलेले पहिले SE मॉडेल देखील असेल. मात्र, हा फोन कधी लाँच होईल आणि त्यासाठी किती वेळ लागेल हे मात्र अद्याप सांगू शकत नाही. तोपर्यंत फोनमध्ये अनेक फिचर्स अॅडदेखील होऊ शकतात.