मुंबई : बाजारात नवा आयफोन आला की तो विकत घेण्यासाठी ग्राहकांची लांबच लांब रांग लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ग्राहकांचा हा त्रास थोडा कमी होणार आहे. कारण एअरटेलने iPhone X ग्राहकांना ऑनलाईन खुला करून दिला आहे. 
  
शुक्रवारी एअरटेलने केलेल्या घोषणेनुसार, अ‍ॅपलचे नवे आयफोन ' सुपर प्रिमियम' द्वारा ऑनलाईन खुले केले आहेत. 


64GB व्हेरिएंटचचा iPhone X सुमारे ८९००० हजारांचा आहे. तर 256GB व्हर्जनचा आयफोन १०२००० रूपयांमध्ये उपलब्ध आहे. 


३ नोव्हेंबरला पहिल्या ऑनलाईन विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या आयफोनची विक्री अवघ्या काही मिनिटांमध्ये संपली होती. 


एअरटेलच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये पोस्टपेडच्या ग्राहकांसाठी आयफोनची खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  तसेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह  आणि फूल पेमेंट अशा खास सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. 


नवा आयफोनची घरपोच आणि मोफत सुविधा मिळणार आहे.