iPhone14: जाणून घ्या... भारतात iPhone का आहे महाग?
जर तुम्ही iPhone विकत घ्यायचा विचार करत असाल... आणि तो तुम्हाला महाग वाटत असेल... किंवा iPhone इतका महाग का आहे? असे प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे.
Apple iPhone Price in India: बऱ्याच लोकांना iPhone भारतात असेंबल झाल्यामुळे त्याची किंमत कमी झाली असेल असं वाटत होते. भारतात iPhone असेंबल झाल्यानंतरही त्याची किमत काही केल्या कमी झाली नाही. नुकताच लाँच झालेला iPhone14 च्या अमेरिकी आणि भारतीय बाजारातील किंमतीत 16 हजार रुपयां इतके अंतर आहे. चला तर मग जाणून घेऊया इतके अंतर का आहे?
iPhone14: Apple ने 7 सप्टेंबरला iPhone14 ची सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये कंपनीने 4 नवीन स्मार्ट फोन लाँच केले ज्यांची किंमत ही वेगवेगळी आहे. जर तुम्ही iPhone14 च्या किंमतींचा विचार केला तर अमेरिकेच्या तुलनेत भारतात iPhone ची किंमत जास्त आहे. अमेरिकी बाजारात iPhone ची किंमत स्पर्धात्मक आहे पण भारतात असे नाही. केवळ नवीन iPhoneच नाही तर iPhone SE 2022 देखील भारतात उपलब्ध होता जो आतापर्यंत 43,900 रुपये (आता 49,900 रुपये) मध्ये उपलब्ध होता. अमेरिकामध्ये या डिवाइसची किंमत जवळजवळ 32 हजार रुपये इतकी आहे. याचा अर्थ भारतीय बाजारात Apple कंपनी 10 हजारांपेक्षा अधिक किंमतीत iPhone विकत आहे.
iPhone भारतात का महाग आहे?
नुकताच लाँच झालेला iPhone14 अमेरिकी बाजारात 799 डॉलरपासून (जवळजवळ 63,700) विकला जात आहे. पण भारतात हाच iPhone14 सुरुवातीला 79,900 रुपयांना लाँच झालायं. दोन्ही बाजारातले फरक जवळजवळ 16,200 रुपये इतका आहे. मग तेव्हा असा प्रश्न पडतो की भारतात iPhone14 का महाग आहे?
iPhone महाग असण्याची कारणे?
CNBC च्या रिपोर्ट अनुसार, या प्रकरणाशी निगडीत एका व्यक्तीने सांगितले की, भारतात iPhone ची किंमत कमी नाही होणार. कारण OEMs (Original Equipment Manufacturers) या कंपोनेंट्सवर अजूनही भारताला जास्तीचा इंपोर्ट ड्यूटी भरवा लागतो. iPhone मध्ये वापरले जाणारे PCBA (Printed Circuit Board Assembly) जवळजवळ 20 टक्के इम्पोर्ट ड्यूटी भरावी लागते. अशाप्रकारे iPhone चार्जर वर देखील 20 टक्के इम्पोर्ट ड्यूटी आहे. इम्पोर्ट ड्यूटी व्यतिरिक्त स्मार्टफोनवर 18 टक्के GST सुद्धा लागते. यावेळेस भारतात iPhone12 आणि iPhone13 असेंबल केले जात आहेत.
भारतात iPhone स्वस्त होईल का?
याशिवाय डॉलर आणि रुपयांमधील वाढती तफावतही iPhoneच्या किमती वाढण्यास कारणीभूत आहे. याच कारणात्सव भारतात Apple प्रोडक्ट्स जपान आणि दुबईच्या मुकाबल्यात महागडे असतात.
खरं सांगायचं झाल्यास भारतात Apple प्रोडक्ट्ससाठी मोठं मार्केट आहे. पण जोपर्यंत भारतात PCBA आणि दूसऱ्या कंपोनेंट्सची मैन्युफैक्चरिंग होत नाही तोपर्यंत Apple प्रोडक्ट्स खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार. कमीतकमी इम्पोर्ट ड्यूटीच्या नियमांनुसार तरी Apple प्रोडक्ट्स महागच मिळणार.