मुंबई : भारतात आधारकार्ड अनेक ठिकाणी ओळख किंवा कायमचा पत्ता म्हणून ग्राह्य धरलं जातं. बॅंकेत खाते उडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड हे आवश्यक आहे. परंतु तुमच्या आधारकार्डचा गैरवापर तर होत नाही ना ? याची प्रत्येकाला माहिती मिळणे गरजेचे आहे. आधारकार्डला यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI जारी करते. आधारकार्ड हे डिजिटल आयडी प्रुफ म्हणून वापरले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधारकार्डशी गेल्या काही वर्षांपासून छेडछाड होत असल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. म्हणूनच सरकारने आधारकार्ड अनिवार्य नसल्याचे घोषित केले आहे. आधारकार्डच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती लीक केली जाते. तसेच यामध्ये फेरबदल करुन आधारकार्डचा चुकीचा वापर केला जात आहे. अशीही खंत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या आधारकार्डाचा वापर कुठे होतोय, याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.


अशाप्रकारे मिळवा माहिती


१) सर्वप्रथम  https://uidai.gov.in/ या वेबसाईटला लॉग इन करा. त्यानंतर my aadhar आधारवर क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.


२) त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी सेंडवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.


३) पुढील पेजवर जाऊन अगोदरचे ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा.


४) पुढील पेजवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची यादी दिसेल. या यादीला पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करता येतं. ही यादी उघड करण्यासाठी पासवर्डची गरज असते. ही यादी बघण्यासाठी तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख टाकणे गरजेचे आहे. 


त्यानंतर या यादीमध्ये तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरलं आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल. या यादीमध्ये तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर, तुम्ही UIDAI ला संपर्क साधून याबाबत तक्रार करु शकता. याची तातडीने तक्रार घेतली जाणार आहे. 


परंतू यासाठी तुम्हाला 1947 टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. तसेच help@uidai.gov.in या वेबसाईटवरही आपली तक्रार नोंदवता येणार आहे.