नवी दिल्ली : गूगलने मंगळवारी सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्यावर डूडल बनवलं आहे. Ismat Chughtai यांचा आज १०७ वा जन्मदिवस आहे. चुगताई यांना गूगल डुडलमध्ये काहीतरी लिहिताना दाखवण्यात आलं आहे.गूगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये डुडलबाबत माहिती देताना म्हटलं आहे. उर्दू फिक्शनला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या आदरणीय इस्मत चुगताई यांचा आज १०७ वां जन्म दिवस आहे.


इस्मत चुगताईचे 'अफसाने' प्रसिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुगताई यांना १९४२ मध्ये त्यांच्या वादग्रस्त लिखाणापैकी एक 'लिहाफ'वरून ओळख मिळाली. चुगताई यांना महिलांकडून आवाज उठवणे आणि समाजात महिलांना पुढे आणण्यासाठी ओळखण्यात येतं. आपल्या लेखात त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरूवातीला, उत्तर प्रदेशातील लहान शहरातील मुलींची स्थिती, दशा आणि वंशवादावर मोकळेपणाने लिहिलं आहे.


मुसलमान महिलांवरीलअन्यायाचं वास्तव मांडलं


दहा भाई-बहिणीत नववी असलेली इस्मत चुगताई, यांचे दोन नंबरचे भाऊ आजिम बेग चुगताईचे शिक्षक होते. आजिम बेग आणि चुगताई हे लघुकथा लिहित असतं. इस्मत यांनी अनेक चित्रपटांची स्क्रीप्ट देखील लिहिली. जुगनू चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. सर्वात आधी १९४३ साली छेडछाड हा सिनेमा आला, यानंतर शेवटचा सिनेमा 'गर्म हवा' 1973 साली आला. या चित्रपटाला घवघवीत यश मिळालं, इस्मत चुगताई यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.


चुगताईंच्या कहाणीत जळजळीत वास्तव


चुगताई यांच्या कहाणीमध्ये वास्तव दिसून येतं. उर्दू साहित्यात त्यांना इस्मत आपा म्हणून देखील ओळखलं जातं. चुगताई यांना १९७६ साली भारत सरकारकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला, त्यांना साहित्य अकादमीने देखील गौरवलं. चुगताई यांचं २४ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झालं. इस्मत चुगताई यांना आपल्या लिखाणातून महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवणे यासाठी ओळखलं जातं.


इस्मत चुगताई प्रसिद्ध उर्दू लेखिला


इस्मत चुगताई यांच्या मुख्य कहाणीत छुई-मुई, चोटें कलियां, एक बात, शैतान सारखी पात्र आहेत. त्यांनी जिद्दी, जंगली कबूतर, अजीब आदमी, मासूमा आणि टेढी लकीर सारख्या कांदबरी लिहिली. तसेच त्यांची आत्मकथा 'कागजी है पैरहन' नावाने प्रकाशित झाली. इस्मत चुगताई सारख्या लेखिकेची आजही गरज आहे, धर्म आणि चालीरितीच्या नावावर मुस्लिम महिलांना अजूनही त्रास होत आहे.