itel S23+ Features: भारतात आयफोनचे चाहते खूप आहेत. त्यांची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कधीकधी बजेट कमी असेल तर आयफोनच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते. पण आता तुमच्या बजेटमध्येच आयफोनप्रमाणे फिचर असलेला फोन तुम्ही खरेदी करु शकता. itel ने अलीकडेच itel S23+ लाँच केला आहे. या फोनमध्ये नवा OTA अपडेट मिळत आहे. यात अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. कॅमेरा ऑप्टिमायजेशनसह AR मेजर फिचरसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. फोनची किंमतही फक्त 14 हजार इतकी आहे. मात्र, फिचर्सच्या बाबतीत प्रमियम फोन्सलादेखील टक्कर देत आहे. जाणून घेऊया  itel S23+ चे फिचर्स.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिपोर्टनुसार, फेस अनलॉक, बँकग्राउंट कॉल, चार्जिंग अॅनिमेशन, चार्जिंग पूर्ण झाल्याची रिमाइंडर आणि बॅटरी लो झाल्याचे रिमाइंडर सारखे फिचर सुरू किंवा बंद करु शकता. डायनामिक बारचा वापर करणेही खूप सोपं आहे.या फोनच्या स्क्रीनवर स्लाइड केल्यास डायनामिक बार दिसेल. तुम्ही कोणत्याही अॅपवर टॅप करुन त्यावर जाऊ शकता. या नवीन अपडेटमध्ये कॅमेरा सॉफ्टवेअरदेखील देण्यात आले आहे. ज्यामुळं फोटो आणि व्हिडिओच्या गुणवत्तेत कमालीचा बदल झाला आहे. या अपडेटमुळं कॅमेराचा फोकस, एडिटचे पर्याय यात बदल झाला असून ते अधिक अद्यावत झाले आहेत. 


फोनच्या सिक्युरिटीबाबतही अपडेटमध्ये बदल करण्यात आले आहे. तसंच, युजर्सना आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट प्राप्त होतो. त्यासाठी विशेष सेटिंग करावी लागते. ही सुविधा त्या लोकांसाठी व परिसरासाठी आहे जिथे सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका असतो. उदाहरणार्थ, भूकंप आणि त्सुनामीसारखे संकट आल्यास या अलर्टचा वापर होऊ शकतो. 


itel S23+ specifications


itel S23 एक आकर्षक आणि भन्नाट फिचर्स असलेला स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये रोजच्या आयुष्यात वापरण्यात येणारी व गरजेसाठी लागणारे फिचर्स देण्यात आले आहेत. यात 6.78 इंचाची 60 HZ AMOLED कर्व्ड स्क्रीन असून यामुळं युजर्सना व्हिडिओ आणि गेम प्लेचा आनंद मिळेल. यात Unisoc Tiger T616 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळं तुम्हाला मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी पुरेसा बॅकअप मिळतो.  


itel S23 चा कॅमरा सेटअपदेखील कमाल आहे. यात 10 x पर्यंत झूम आणि LED फ्लॅशसोबतच 50 MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 32 MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB ऑनबोर्ड स्टोरेजदेखील देण्यात आली आहे. यात अतिरिक्त 8 GB व्हर्चुअल रॅमदेखील सपोर्ट करते. यात तुम्हाला मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी पर्याप्त रॅमदेखील देण्यात आली आहे.