नवी दिल्ली : जगातील प्रसिद्ध फोर व्हिलर निर्माता कंपनी जीप (Jeep)ने भारतीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवी योजना तयार केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीपच्या वाहनांना पूर्वीपासूनच भारतीयांच्या पसंती मिळाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या नव्या गाड्याही नागरिकांना आवडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २०२० पर्यंत इंडियन ऑटो मार्केटमध्ये ५ नव्या SUV सादर करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.


यापैकी कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनिगेड (Renegade) सर्वातआधी लॉन्च केली जाणार आहे. एक नजर टाकूयात SUV रेनिगेड गाडीच्या फिचर्सवर...


Image: www.jeep.com

असं म्हटलं जात आहे की, रेनिगेड ही गाडी जीपची भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त SUV असणार आहे. Jeep कंपनी इतर कॉम्पॅक्ट सेडान क्रेटा आणि डस्टर याच्या आधारे रेनिगेडची किंमत ठरवणार आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, क्रेटाच्या तुलनेत रेनिगेड (Renegade) ची किंमत एक लाख रुपयांनी अधिक असणार आहे.


Image: www.jeep.com

कॉम्पॅक्ट साईज


सध्या जगातील इतर देशांमध्ये रेनिगेडची जी साईज उपलब्ध आहे त्याची लांबी ४.२ मीटर, उंची १.७ मीटर आणि रुंदी १.९ मीटर आहे. याच सेगमेंटच्या क्रेटाची लांबी ४.२ मीटर, उंची १.६ मीटर आणि रुंदी १.८ मीटर आहे. तर, रेनॉल्टच्या डस्टरची लांबी ४.३ मीटर, उंची १.६९ मीटर आणि रुंदी १.८ मीटर आहे. याप्रमाणे रेनिगेड ही कॉम्पॅक्ट सेगमेंटच्या कारमध्ये सर्वात उंच आणि रुंद कार असणार आहे.


इंजिन कॉलिटी


भारतीय बाजारपेठेत जीप रेनिगेडमध्ये कॅम्पसचं लोअर पॉवर आऊटपूट असलेलं इंजिन लावण्यात येणार आहे. या आधारे रेनिगेडमध्ये २.० लीटरचं डिझेल इंजिन असलण्याची शक्यता आहे. हे इंजिन १४० HP पॉवर देतं. जीप यामध्ये १.६ लीटरचं मल्टीजेट इंजिनचा वापर करु शकते.


Image: www.jeep.com

फोर व्हिल ड्राईव्ह ऑप्शनल


कॅम्पसच्या आधारावरही जीप रेनिगेडमध्ये ४ व्हिल ड्राईव्हला ऑप्शनल देण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे. जीपची नवी एसयूव्ही भारतीय बाजारात २०१८च्या शेवटपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते.