मुंबई : तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हा प्रॉब्लेम जिओकडूनच असेल असे काही नाही. फोनमधील सेटिंगमुळेही जिओच्या स्पीडवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यूजर्सनी त्यांच्या फोनमधील सेटिंग चेंज केल्यास हाय स्पीड इंटरनेट मिळू शकते. 


जाणून घ्या या ४ सेटिंग


APN सेटिंग बदला
APN सेटिंग चेंज करुन तुम्ही जिओ ४जी स्पीड वाढवू शकता. यासाठी मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन मोबाईल नेटवर्क्स हा पर्याय निवडा. यात तुम्हाला प्रिफर्ड नेटवर्क टाईपला  LTEमध्ये सेट करा. 


आता पुन्हा सेटिंगमध्ये जा आणि Access point names ला सिलेक्ट करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यात APN प्रोटोकॉलचा पर्याय निवडा. 


याच ठिकाणी Bearerचा पर्याय मिळेल. यातही lte निवडा.


अँड्रॉईड सिस्टीम रँडमली काही फाईल्स वापरते आणि त्या फाईल्स सेव्ह केल्या जातात. या फाईल्सना कॅशे फाईल्स म्हणतात. या फाईल्स डिलीट केल्याने तुमचा स्पीड वाढू शकतो.