तुमच्याकडे शाओमीचा हा स्मार्टफोन तर नाही ना! मग Jio 5G च्या नावाने बोंबच
Jio 5G Network: देशात शाओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वाधिक आहे. स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक जण शाओमीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. पण तुमच्याकडे शाओमीचा स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण शाओमीच्या काही स्मार्टफोनवर तुम्हाला जीओची 5जी सेवा वापरता येणार नाही.
Xiaomi Smartphone Jio 5G Network Service: तंत्रज्ञानाच्या युगात सर्वकाही झपाट्याने बदलत आहेत. 3 जी ला मागे टाकत 4 जी तंत्रज्ञानाचं युग आलं. आता 4 जीला मागे टाकत 5 जी नेटवर्क आपले पाय रोवत आहेत. भारतात जिओ स्टँड अलोन 5जी नेटवर्कवर काम करते. तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर सुविधा पुरवत आहे. 17 जानेवारीपासून देशभरातील 7 राज्यांतील 16 शहरांमध्ये जिओ 5 जी सेवा सुरू झाली आहे. यासह, जिओ 5जीशी जोडलेल्या शहरांची एकूण संख्या आता 134 वर पोहोचली आहे. मात्र 5 जी नेटवर्क आपल्या स्मार्टफोनमध्ये चालणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशात शाओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वाधिक आहे. स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक जण शाओमीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. पण तुमच्याकडे शाओमीचा स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण शाओमीच्या काही स्मार्टफोनवर तुम्हाला जीओची 5जी सेवा वापरता येणार नाही.
टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, शाओमी एमआय 10 आणि शाओमी एमआय 10आय वर 5जी सर्व्हिस मिळणार नाही. कारण हे दोन्ही फोन जिओ 5जी स्टँड अलोन नेटवर्कला सपोर्ट करणारे नाहीत. त्यामुळे या दोन्ही फोनमध्ये जिओचं नेटवर्क काम करणार नाही. स्टँड अलोनमध्ये कंपनीचं स्वतंत्र असे टॉवर आहेत. म्हणजेच 4जी टॉवरची मदत घेतली जात नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची गोची होणार आहे. एकतर स्मार्टफोन बदलवा लागेल किंवा एअरटेलकडे स्विच व्हावं लागेल.
बातमी वाचा- Smartphone Tricks : स्मार्टफोनवरील हा छोटासा होल आहे खूप कामाचा... हे फिचर तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हतं
शाओमीचा एमआय 10 स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. हा स्मार्टफोन भारतात 2021 मध्ये लाँच झाला होता. सध्या या स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये आहे. तर एमआय 10 आयची किंमत 21,999 रुपये इतकी आहे.