नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त OTT आणि वर्क फ्रॉम होममुळे जास्त इंटरनेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपन्यांनी प्रत्येक रिचार्जवर एक OTT अॅप महिन्याभरासाठी सब्स्क्रिप्शन देण्यावर भर देत आहेत. अनेक ऑफर्स आणि स्कीम कंपन्या देत आहेत. जिओ, वोडाफोन आणि एअरटेलने 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खास प्लॅन आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोन 301 रुपयांचा प्लॅन


वोडाफोनचा 301 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल सोबत रोज 100 SMS देखील मिळणार आहेत. 1.5 GB डेटा आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे.


वोडाफोन ग्राहकांना 2GB अतिरिक्त डेटाही या प्लॅनमध्ये देणार आहे. या व्यतिरिक्त, Vi ग्राहकांना आरोग्य विम्याचे फायदे देखील देत आहे. ज्यामध्ये 10 दिवसांसाठी प्रतिदिन 1000 रुपये दराने हॉस्पिटलायझेशन खर्च देखील दिला जाईल.


जिओ 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन


जिओ ग्राहकांना आपल्या प्लॅनमध्ये अधिक जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करत असतं. 349 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS 28 दिवसांच्या वैधतेसोबत मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT फायदा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 400 हून अधिक रुपये खर्च करावे लागतात. 


एअरटेल 349 प्रीपेड प्लॅन


एअरटेलचा 349 रुपयांचा प्लॅन हा फायदेशीर आहे. ज्यांना OTT हवं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं सांगितलं जातं. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2.5 GB डेटा मिळणार आहे. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. 


Amazon Prime Video चे मोबाईल सब्सक्रिप्शन दिले जाईल. याशिवाय, युझर्सला तीन महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल, विंक म्युझिक आणि शॉ अकादमीमध्ये प्रवेश देखील दिला जाईल.