मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात आल्यानंतर आता रिलायंस जिओ (Reliance Jio) जिओ गीगाफाइबर FTTH ब्रॉडबँड सर्विस सुरु करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनीने त्या शहरांमध्ये सर्वात आधी ही सेवा सुरु करणार आहे ज्या शहरातून सर्वाधिक अर्ज येतील. जर तुम्हाला जिओची ही सेवा हवी असेल तर तुम्ही Jio.com वर अर्ज करु शकता.


3 महिने फ्री सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार कंपनी सर्व ग्राहकांना सुरुवातीला 3 महिने मोफत सेवा देणार आहे. ज्यामध्ये 100 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.


या शहरांमध्ये सुरु होणार सेवा


बंगळुरु, चेन्‍नई, रांची, पुणे, इंदौर, ठाणे, भोपाळ, लखनऊ, कानपूर, पटना, इलाहाबाद, रायपूर, नागपूर, गाजियाबाद, लुधियाना, मदुरै, नाशिक, फरीदाबाद, कोयंबतूर, गुवाहाटी, आग्रा, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, चंडीगढ, जोधपूर, कोटा आणि सोलापूर.


500 रुपयाचा प्लान


टाइम्‍सनाऊच्या रिपोर्टनुसार कंपनीने अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी अशी शक्यता आहे की, जिओ गीगाफायबर प्लान 500 रुपयांपासून सुरु होणार आहे. या प्‍लानमध्ये 50 Mbps ची स्पीड मिळू शकते. ज्यामध्ये महिन्याला 300 जीबी डेटा मिळणार आहे.