मुंबई :  रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक अनलिमिटेड सुविधा प्रदान केल्या आहेत. जीओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स  देत असते. आता ग्राहकांना अनलिमिटेड सुविधांसह OTT प्लॅटफॉर्मचीही सुविधा देण्यात येत आहे. जीओच्या काही प्रीपेड प्लॅन्सवर ग्राहकांना Disney + Hotstar ची स्ट्रीमिंग मिळते. तर काहींना Netflix आणि Amazon चे पॅकेज मिळतात. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला जीओच्या सर्वात  स्वस्त प्लॅनची  माहिती देणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
जीओचे वापरकर्ते पोस्टपेड प्लॅन तयार करीत आहेत. त्यांच्यासाठी सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix, Amazon, Disney + Hotstar मोफत पाहयला मिळणार आहे. तसेच प्लॅनमध्ये 75 जीबीचा डेटा सोबत मिळतो. आणि हा प्लॅन तुम्हाला 200 जीबींचा कमाल डेटा रोलओवर देतो. याशिवाय अनलिमिटेड वाइस कॉल तसेच 100  SMS प्रतिदिवस मिळतो. 


599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनच्या अंतर्गत तुम्हाला बिलिंग सायकलमध्ये 100 GB डेटा आणि 200 जीबीचा कमाल डेटा रोलओवर मिळतो.  या प्लॅनमध्ये Netflix, Amazon आणि Disney+ Hotstar मोफत मिळते.


प्रीपेड ग्राहकांसाठी ऑफर
जर तुम्ही जीओची सुविधा वापरत आहात. तर 401, 598, 777, आणि 2599 रुपयांमध्ये मोफत OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळत आहे.