नवी दिल्ली :  सर्वाधिक डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओने पुन्हा अव्वल क्रमांक पटाकवलाय. देशात ४ जी सेवा देणाऱ्या वोडाफोन, एअरटेलला जिओने मागे टाकलंय. देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एअरटेल स्पीडच्या यादीत चौथ्या स्थानावर फेकली गेलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायच्या मायस्पीड पोर्टलनुसार जुलैमध्ये जुलैमध्ये जिओचा डाऊनलोड स्पीड 18.65 एमबीपीएस इतका होत्या. तर या महिन्यात एअरटेलचा स्पीड ८.९१ एमबीपीएस इतका होता. स्पीडच्या यादीत ११.०२ एमबीपीएस स्पीडसह वोडाफोन दुसऱ्या स्थानावर आहे. तर ९.४६ एमबीपीएस स्पीडसह आयडियाने तिसरे स्थान मिळवले. 


जूनमध्ये एअरटेलाचा स्पीड ८.२२ एमबीपीएस आणि मेमध्ये १०.१५ एमबीपीएस इतका होता. वोडाफोचा जूनमध्ये १२.२९ एमबीपीएस तर मेमध्ये १३.३८ एमबीपीएस स्पीड होता. आयडियाचा जूनमध्ये डाऊनलोड स्पीड ११.६८ एमबीपीएस तर मेमध्ये १३.७० एमबीपीएस होता.